Priyanka Chopra Nick Jonas Wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज
Umaid Bhawan Palace in Jodhpur (Photo credits: Umaid Bhawan website)

दीपिका (Deepika Padukon)  आणि रणवीर सिंग (Ranveer Singh)  यांच्या इटलीतील शाही विवाह सोहळ्यानंतर साऱ्यांनाच निक जोनस (Nick Jonas) आणि प्रियांका चोप्राच्या (Priyanka Chopra) लग्नाची उत्सुकता आहे. निक आणि प्रियांका चोप्रा ही जोडी जोधपूरच्या उमेद भवन (Umaid Bhavan Palace) पॅलेसमध्ये २ डिसेंबरला विवाह बद्ध होणार आहे. अमेरिकन पॉप गायक मुंबईचा जावई होणार असल्याने आणि हा विवाह सोहळा हिंदू पद्धतीने पार पडणार असल्याने प्रियांकाच्या चाहत्यांना या लग्नाची देखील कमालीची उत्सुकता आहे.

जोधपूरमध्ये शाही विवाह सोहळा

प्रियांका आणि निकाने जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसची (Umaid Bhavan Palace)  निवड केली आहे. हा पॅलेस २६ एकरवर वसलेला आहे. या पॅलेसमध्ये सुमारे 347 खोल्या आहेत. महाराजा उमेद सिंग यांनी या राजवाड्याची बांधणी केली आहे. येथे राजघराणं वास्तव्यास होते. 1929 पासून बांधायला घेतलेला हा राजवाडा 1943 साली बांधून पूर्ण झाला. 2005 सालापासून Taj Hotels Resorts यांनी या  राजवाड्याला हॉटेलच्या स्वरुरूपात सांभाळण्यास सुरुवात केली आहे.

 

 

View this post on Instagram

 

Umaid Bhawan - Real taste of royalty #Jodhpur #Travel #tourism #RoyalFamily #bluecity #history #umaidbhawanpalace #architecture

A post shared by Vasu Yadav (@adventures_with_vasu) on

 

View this post on Instagram

 

Creating memories which are priceless #luxury #heritage #unique #royal #palace #worldsbesthotel 2016 #tajhotels

A post shared by Umaid Bhawan Palace (@umaidbhawanpalace) on

अमेरिकेत पार पडलं प्रियांका चोप्राचं 'ब्रायडल शॉवर' आता  राजस्थानातील या नयनरम्य ठिकाणी निक आणि प्रियांका विवाहबद्ध होणार आहेत. त्यामुळे साऱ्यांनाच या भव्य पॅलेसमधील त्यांच्या लग्नाचे फोटो पाहायचे आहेत.