अमेरिकेत पार पडलं प्रियांका चोप्राचं  'ब्रायडल शॉवर'
प्रियांका प्री वेडिंग (Pic Credit: Instagram)

लवकरच बॉलिवूडमधील तीन मोठे स्टार्स लग्न बंधनात अडकण्याच्या तयारीत आहे. दिवाळीनंतर रणवीर आणि दीपिका पादुकोण ही जोडी 14-15 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. तर त्यानंतर प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन पॉपस्टार निक जोनासही जोधपूरमध्ये लग्न करणार आहेत. भारतामध्ये लगीन घाईला सुरूवात करण्यापूर्वी अमेरिकेत प्रियांका चोप्रासाठी खास 'ब्रायडल शॉवर' आयोजित करण्यात आलं होतं. निक आणि प्रियांकाचे अनेक मित्र-मैत्रिणी अमेरिकेत आहेत.

इंस्टाग्राम अकाऊंटवर प्रियांकाच्या 'ब्रायडल शॉवर'चे फोटो व्हायरल झाले आहेत. प्रियांकाने पांढरा शुभ्र ऑफ शोल्डर ड्रेस घातला होता. प्रियांकाच्या या सॅटीन ड्रेसवर खास फेदरचं बॉटम वर्क आहे. या ड्रेसमध्ये प्रियांका अत्यंत सुंदर दिसत होती. लवकरच भारतामध्येही नववधूच्या रूपात सजायला प्रियांका दाखल होणार आहे. भारतीय - हिंदू परंपरेनुसार, राजेशाही थाटात निक आणि प्रियांकाचा लग्नसोहळा पार पडणार आहे. निकने प्रियंकासाठी खरेदी केलं आलिशान घर ; इतकी आहे किंमत

प्रियांकाच्या लग्नाचे विधी 30 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तर 1आणि 2 डिसेंबरला त्यांच्या लग्नाचा मुख्य सोहळा आणि रिसेप्शन आहे. मात्र याच दिवसांमध्ये रणवीर आणि दीपिकाचंही रिसेप्शन असल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्समधून पुढे आली आहे. त्यामुळे या दोन्ही जोड्यांचं रिसेप्शन एकाच दिवशी असल्याने क्लॅश होणार ? की एक जोडी त्यांचे रिसेप्शन पुढे-मागे करणार ? हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.