प्रियांका -निक Photo Credits Instagram

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास या सेलिब्रिटी जोडीच्या लग्नाची त्यांच्या फॅन्सला अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. अखेर प्रियांका आणि निकच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण ठरलं आहे. येत्या 2 डिसेंबरला प्रियांका आणि निक भारतीय पद्धतीनुसार लग्नबंधनात अडकणार आहेत. जोधपूरच्या ‘उमेद भवन पॅलेस’चं नाव चर्चेत आहे. प्रियांका आणि निक जोनासचा विवाहसोहळा पारंपारिक आणि तितकाच राजेशाही थाटात पार पडणार आहे.

काही दिवसांपूर्वी प्रियांका आणि निक दोघेही एकत्र जोधपूरमध्ये आले होते. त्यावेळेस लग्नाच्या ठिकाणाचं नाव ठरवण्यात आल्याची चर्चा आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार प्रियांका आणि निक 2 डिसेंबरला विवाहबंधनात अडकतील. लग्नाचे विधी 30 नोव्हेंबरपासून सुरू होतील. मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होईल अशी महिती देण्यात आली आहे.

निक जोनास हा प्रसिद्ध गायक, संगीतकार आहे. निक आणि प्रियांका यांच्यामध्ये दहा वर्षांचे अंतर आहे. निक प्रियांकापेक्षा लहान असल्याने या जोडीबद्दल अनेक चर्चादेखील रंगल्या होत्या. मात्र वर्षभर एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर प्रियांका आणि निकने लग्नाच्या बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. हॉलिवूडच्या प्रोजेक्ट्ससाठी प्रियांका अमेरिकेमध्ये होती. तेथेच 'क्वॉंटिको' सिरीजच्या सेटवर

निक आणि प्रियांकाची भेट झाली.