निकने प्रियंकासाठी खरेदी केलं आलिशान घर ; इतकी आहे किंमत
प्रियंका-निकचं नवं घर (Pic Credit: Dailymail)

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक, अभिनेता निक जोनस लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. तत्पूर्वी, निकने आपल्या होणाऱ्या पत्नीसाठी ड्रिम होमची खरेदी केली आहे. या आलिशान घराची किंमत तब्बल 47 कोटीहून अधिक असल्याचे बोलले जात आहे.

कॉलिफोर्नियातील बेवर्ली हिल्स भागात हे आलिशान घर आहे. या परिसरात अनेक हॉलिवूड सेलिब्रेटींची घरं आहेत. साडेपाच हजार स्वेअर फिटच्या या घरात 5 बेडरुम्स, स्विमिंग पूल आणि अनेक अत्याधुनिक सोयी सुविधा आहेत.

(Pic Credit: Daily Mail)

(Pic Credit: Daily Mail)

सध्या प्रियंका न्यूयॉर्कमधील 30 पार्क प्लेस या इमारतीत राहते. न्यूयॉर्कमधील हे सर्वात महागडं आणि आलिशान ठिकाण आहे. 83 मजल्याच्या या इमारतीतून संपूर्ण न्यूयॉर्क शहर पाहायला मिळतं. लग्नानंतर मात्र प्रियंका-निक बेवर्ली हिल्समधील नव्या घरात राहायला जाणार आहेत.

(Pic Credit: Daily Mail)

(Pic Credit: Daily Mail)

(Pic Credit: Daily Mail)

(Pic Credit: Daily Mail)

(Pic Credit: Daily Mail)

(Pic Credit: Daily Mail)

(Pic Credit: Daily Mail)

प्रियंका आणि निक जोनस 2 डिसेंबरला जोधपूरमध्ये विवाहबंधनात अडणार असल्याचे समजतेय. प्रियांका चोप्रा - निक जोनासच्या लग्नाची तारीख ठरली ! जोधपूरला पार पडणार शाही सोहळा