Priyanka -Nick Wedding : Sangeet Ceremony (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि अमेरिकन गायक निक जोनस (Nick Jonas) आज हिंदू परंपरेनुसार लग्न करणार आहे. या लग्नसोहळ्यादरम्यान प्रियांकाने आज तिच्या इन्स्टाग्रामच्या(Instagram) अकाऊंटवरुन संगीत कार्यक्रमाचा एक सुंदर व्हिडिओ पोस्ट केला आहे. तर या व्हिडिओच्या खाली मनाला भारावून टाकेल असा मेसेज ही लिहिला आहे. या संगीत कार्यक्रमात निकच्या घरातील मंडळीसुद्धा खूप उत्साही दिसून आली.

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत प्रियांकाने लिहिले की, 'आमच्या दोघांच्या परिवारामध्ये जबरदस्तीने डान्सची स्पर्धा रंगली मात्र या स्पर्धेचा अंत प्रेमपूर्ण दिसून आला. निक आणि मी या संगीत कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहात असून हा कार्यक्रम Pre-Wedding चा हिस्सा आहे. हा कार्यक्रम खूपच आनंदी वातवरण निर्माण करुन गेला.तर आमच्या दोघांच्या घरातील मंडळींनी डान्स करुन आमच्या प्रेम कहाणीसाठी त्यांचा आनंद व्यक्त केला.'

या संगीत कार्यक्रमात निकयांका यांच्या घरातील मंडळींनी उत्साहाने डान्स केला. तर मधु चोप्रा यांनी त्यांच्या नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतेले.