Nana Patekar On Viral Video: सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याला थप्पड मारल्याप्ररकणी नाना पाटेकर यांनी दिली प्रतिक्रिया
Nana Patekar viral video

नाना पाटेकर (Nana Patekar) हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. दरम्यान वाराणसीत शुटींग दरम्यान सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका तरुणाला थप्पड मारल्यामुळे अभिनेता नाना पाटेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक दिवसांपासून वाराणसीत शुटींग चालू असताना काल नाना पाटेकरांनी एका तरुणाला थप्पड मारले आहे. या प्रकरणात स्वत: नाना पाटेकरांनी प्रतिक्रिया मांडून खुलासा केला आहे.

नाना पाटेकर म्हणाले की, व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो आमच्या चित्रपटाचा क्रम आहे. आम्ही एक रिहर्सल केली होती... आमची दुसरी तालीम होणार होती. दिग्दर्शकाने मला सुरुवात करायला सांगितली. जेव्हा व्हिडिओत दिसल्याप्रमाणे मुलगा आला तेव्हा आम्ही सुरुवात करणार होतो. तो कोण आहे हे मला माहीत नव्हते, मला वाटले की तो आमच्या क्रूपैकी एक आहे. सीन प्रमाणे त्याला मी थप्पड मारली आणि मी त्याला निघून जाण्यास सांगितले. नंतर मला कळले की तो क्रूचा भाग नव्हता. म्हणून मी त्याला परत बोलावणार होतो पण तो पळून गेला असावा. कदाचित त्याच्या मित्राने व्हिडिओ शूट केला असेल. मी फोटोसाठी कधीही कोणाला नाही म्हटले नाही. मी हे करत नाही... चुकून हे घडले... काही गैरसमज झाला असेल तर मला माफ करा... मी असे काहीही करणार नाही..." खूप गर्दीत आम्ही हजारो फोटो काढले आहे.

या घटनेनंतर अनेकांनी नाना पाटेकर यांच्या कृतीचा विरोध केला. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या वागण्यावर कंमेट केली आहे. या घटनेचा विरोध होत असताना नाना पाटेकरांनी बुधवारी रात्री माफी मागितली आहे.