Barkha Bisht (Photo Credits: Twitter)

पुण्यामध्ये (Pune) 2010 साली झालेल्या बॉम्ब स्फोटामुळे (2010 Pune Bombing) अवघे शहर हादरून गेले होते. त्या घटनेच्या जखमा अजूनही पुणेकरांच्या मनावर ताज्या आहेत. अशात या स्फोटाशी निगडीत एक वेब सिरीज येऊ घातली आहे. अभिनेत्री बरखा बिश्त (Barkha Bisht) 2010 च्या जीवघेण्या बॉम्बस्फोटांशी प्रेरित अशा या वेब सिरीजमध्ये काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या या शोचे नाव 'नाम घूम जायेगा' (Naam Ghum Jayega) असे ठेवण्यात आले आहे. त्याबद्दल बोलताना बरखा म्हणाली की, मी या शोचा एक भाग बनत आहे याबद्दल मी फार उत्साहित आहे.

तिने पुढे सांगितले, या सिरीजच्या स्क्रिप्टने मला आकर्षित केले आणि मी लगेच त्यासाठी होकार दर्शविला. या सिरीजमध्ये एका विवाहित जोडप्याची कथा दिसणार आहे, जे अचानक या बॉम्बस्फोटात संशयित म्हणून सामील होतात. सिरीजमधील आपल्या पात्रावर प्रकाश टाकत बरखा म्हणाली, मी आयेशा नावाचे पात्र रंगवत आहे, जी एक साधी मुस्लिम विवाहित स्त्री आहे. आयेशाचे आयुष्य तिचा पती आणि त्यांच्या मुलाभोवती फिरत असते, मात्र जेव्हा तिचे पतन होते तेव्हा खरे रूप समोर येते.

(हेही वाचा: Mouni Roy हिचा ब्लॅक बिकनीतील सेक्सी फोटो पाहिलात का?)

बरखा सांगते, ‘मी नेहमी माझ्या दिग्दर्शकाचे ऐकते व त्यानुसारच मी माझे पात्र रंगवते. 'नाम घुम जायेगा' चे दिग्दर्शन अक्षय वीर सिंह करत आहे. लवकरच या सिरीजचे शुटींग सुरु होईल. महत्वाचे म्हणजे ही सिरीज ‘उल्लू अॅप’वर (ULLU App) रिलीज होणार आहे. दरम्यान, टीव्हीचा सर्वात मोठा रिअॅलिटी शो 'बिग बॉस' त्याच्या नवीन सीझनसह सज्ज आहे. 'बिग बॉस 15' 2 ऑक्टोबरला कलर्स टीव्हीवर सुरु होत आहे. अशात रिपोर्ट्स समोर आले होते की, यंदा बरखा बिश्त या शोचा हिसा असू शकेल. मात्र अजूनतरी त्याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.