Singham (PC -Twitter/ @Ajaydevgn95)

Bombay HC Judge On Singham Film: बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) ने अनेक हिट, सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम' (Singham) हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट त्यापैकीच एक आहे. हा चित्रपट 2011 साली प्रदर्शित झाला होता. 41 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 150 कोटींची कमाई केली होती. यानंतर 2014 मध्ये 'सिंघम 2' चित्रपटाचा सिक्वेल रिलीज झाला. या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटालाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. आता या चित्रपटाचा तिसरा सिक्वेल ‘सिंघम 3’ बद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.

चित्रपटाच्या तिसरा भाग पुढील वर्षी 2024 मध्ये 15 ऑगस्टच्या सुमारास प्रदर्शित होऊ शकतो. दरम्यान, वेगाने व्हायरल होत असलेल्या अजय देवगणच्या 'सिंघम' या चित्रपटाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी मोठे वक्तव्य केले आहे. वास्तविक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गौतम पटेल (Gautam Patel) यांनी शुक्रवारी पोलिसांच्या कारवाईबाबत कडक विधान केले आहे. (हेही वाचा -Bollywood News: अॅसिड हल्ल्यात वाचलेल्या तरुणीच्या पोस्टवर शाहरुख खानने दिलं 'असं' उत्तर, पोस्ट व्हायरल)

भारतीय पोलीस फाउंडेशनतर्फे आयोजित वार्षिक दिन आणि पोलीस सुधारणा दिन कार्यक्रमादरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गौतम पटेल म्हणाले की, 'कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेची पर्वा न करता, अजय देवगणच्या 'सिंघम' प्रमाणे त्वरित न्याय मिळवून देणाऱ्या 'हिरो कॉप' चित्रपटांची प्रतिमा खूप घातक संदेश देते.'

तसेच पोलीस सुधारणांबाबत बोलताना न्यायमूर्ती गौतम पटेल म्हणाले की, 'प्रकाश सिंग प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ही एक हुकलेली संधी होती. आपण स्वतःमध्ये सुधारणा केल्याशिवाय कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा सुधारू शकत नाही. पोलिसांची दबंग, भ्रष्ट आणि बेजबाबदार अशी प्रतिमा लोकप्रिय आहे. तसेच न्यायाधीश, राजकारणी आणि पत्रकारांसह सार्वजनिक जीवनातील कोणाबद्दलही असं म्हणता येऊ शकतं,' असंही ते पटेल यांनी यावेळी म्हटलं.