Uorfi Javed (Photo Credits-Instagram)

स्प्लिट्सव्हिला 14 फेम उर्फी जावेदने (Uorfi Javed) महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षा आणि भाजप नेत्या चित्रा किशोर वाघ (Chitra Wagh) यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह कपडे परिधान केल्याबद्दल भाजपच्या चित्रा वाघ यांनी यापूर्वी उर्फी जावेदला फटकारले होते. आता उर्फीने वाघ यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, चित्रा वाघ तिला सतत धमक्या देत आहेत. उर्फी जावेदचे वकील नितीन सातपुते यांनी याबाबत माहिती दिली.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, उर्फी जावेदचे वकील नितीन सातपुते यांनी सांगितले की, त्यांनी भाजप पक्षाच्या कार्यकर्त्या चित्रा किशोर वाघ यांच्याविरुद्ध कलम 153(A)(B), 504, 506, 506(ii) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मॉडेल/अभिनेत्री उर्फी जावेद हिला गुन्हेगारी धमकी दिल्याबद्दल ते आयपीसीसह CrPC च्या कलम 149 आणि 107 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईची विनंती केली आहे.

उर्फी जावेदच्या वकिलाने असेही सांगितले की, त्यांनी तक्रारीची प्रत महिला आयोगाला देखील पाठवली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या श्रीमती रुपाली चाकणकर यांना त्यांनी या प्रकरणी कारवाई करण्याची विनंती केली आहे. आपल्या  तक्रारीत सातपुते यांनी उर्फीवर चित्रा वाघ यांच्या धमकीमुळे मॉब लिंचिंगचा धोका असल्याचे म्हटले आहे. म्हणूनच उर्फीच्या वकिलानेही पोलीस कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी मीडियाने उर्फी जावेद हिच्याशीही बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. (हेही वाचा:  'जोपर्यंत माझे Private Parts दिसत नाहीत तोपर्यंत मला तुरुंगात टाकता येणार नाही'; उर्फी जावेदचे चित्रा वाघ यांच्या तक्रारीला उत्तर)

अशात उर्फी जावेदचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती महाराष्ट्र महिला आयोगाच्या कार्यालयात जाताना दिसत आहे. वाघ यांची पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर उर्फी जावेद रुपाली चाकणकर यांना भेटण्यासाठी तेथे पोहोचल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर अश्लीलतेचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्यांनी मुंबई पोलिसांकडे उर्फीला अटक करण्याची मागणीही केली होती.