
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपुर च्या पाठोपाठ त्याची गर्लफ्रेंड मलाइका अरोड़ा हिला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. मलाइका ची बहीण अमृता अरोड़ा हिने याविषयी माध्यमांंना माहिती दिली होती तर मलाइकाने सुद्धा काही वेळापुर्वी या माहितीची पुष्टी करत आपण कोरोनाबाधित आहोत असे सांंगितले आहे. आपल्यात कोरोनाची लक्षणे नाहीत मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मी स्वतःला घरातच आयसोलेट करुन घेतले आहे.यावर मात करुन मी लवकरच आणखी हेल्थी होऊन समोर येईन असे मलाइकाने सांंगितले आहे. मलाइका सध्या India's Best Dancer स्पर्धेत परिक्षक म्हणुन प्रेक्षकांंच्या समोर येत आहे. Himansh Kohli Covid Tests Positive: बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहलीसह कुटुंबातील सदस्यांना कोरोना विषाणूची लागण; सोशल मीडियावर दिली माहिती
दुसरीकडे मलाइकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपुर सुद्धा होम क्वारंटाइन झाला आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम वरुन आपले कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांंगितले होते.
दरम्यान, कोरोनाची सुरुवात झाल्यापासुन राजकारण, बॉलिवूड सहित वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटी सुद्धा कोरोनाच्या विळख्यात अडकले होते. एकीकडे लॉकडाउन नंंतर आता कुठे शुटींंगला परवानगी मिळत असताना अशी प्रकरणे समोर आल्याने सिनेसृष्टीसमोर आव्हानच उभे आहे.