KBC 12 Promo: कोविड-19 च्या सेटबॅक नंतर 'कौन बनेगा करोड़पति 12' सह कमबॅक करण्यासाठी अमिताभ बच्चन सज्ज (Watch Video)
Amitabh Bachchan (Photo Credits: Twitter)

Amitabh Bachchan KBC 12 Promo Video:  सोनी टीव्हीवरील (Sony TV) लोकप्रिय कार्यक्रम 'कौन बनेगा करोड़पति 12' (Kaun Banega Crorepati 12) ची प्रेक्षक अधिक आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत. तर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) देखील या कार्यक्रम प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी उत्सुक झाले आहेत. आज या शो चा नवा प्रोमो समोर आला आहे. यात बिग बी (Big B) पुन्हा एकदा हॉट सीटवर विराजमान झालेले पाहायला मिळत आहेत. (KBC Lucky Draw चा बहाणा करत मुंबई मध्ये महिलेकडून 2.90 लाखांची लूट; व्हॉट्सअ‍ॅप वर पाठवले नकली सर्टिफिकेट आणि चेक)

सोनी टीव्हीने हा नवा प्रोमो व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यावर रिट्विट करत बिग बी यांनी लिहिले, "हा कार्यक्रम लवकरच येत आहे. कारण प्रत्येक सेटबॅकचे उत्तर कमबॅक करुनच द्यायला हवे. या शो ची थीम देखील या विषयावर आधारित आहे. प्रत्येक छोट्या कामगिरीत पुढे जाण्याचा विश्वास ठेवा, असे शो मध्ये सहभागी झालेला स्पर्धक बिग बींना सांगत आहे. त्यावर बिग बी नवा मंत्र देतात- सेटबॅकला कमबॅक मध्ये बदलण्याचा," असे प्रोमोत पाहायला मिळत आहे.

पहा प्रोमो:

या शोचे रजिस्ट्रेशन मे 2020 मध्ये सुरु झाले होते. परंतु, लॉकडाऊन आणि अन्य कारणास्तव या शोच्या कामकाजाला काहीसा विलंब झाला. त्यानंतर बिग बींसह कुटुंबिय कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. मात्र कोरोनावर मात केल्यानंतर बिग बी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाले आहेत. वयाच्या 77 व्या वर्षी देखील त्यांचा उत्साह, उर्जा प्रचंड आहे. तसंच त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा वाखाण्याजोगी आहे.