कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातले असून त्याच्या प्रादुर्भावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चनसह अन्य काही कलाकारांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तर आता बॉलिवूड मधील अभिनेता अर्जून कपूर (Arjun Kapoor) याला कोरोनाची लागण झाली आहे. अर्जून याने इंन्स्टाग्रावर पोस्ट करत त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट केले आहे.(Coronavirus: जॅकी भगनानी याने क्वारंटाइन सेंटरसाठी पुढे केला मदतीचा हात, BMC ने मानले आभार)
अर्जुन कपूर याने पोस्ट करत असे म्हटले आहे की, माझे कर्तव्य आहे तुम्हाला सांगणे की माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला बरे वाटत असून डॉक्टर्स आणि अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार होम क्वारंटाइन झालो आहे. तुमच्या आधार बद्दल आधीच आभार मानतो. माझ्या प्रकृती बद्दल मी अपडेट्स देत राहीन. तसेच सर्वजण या कोरोनावर मात करतील अशा मला विश्वास आहे.(KBC 12 Promo: कोविड-19 च्या सेटबॅक नंतर 'कौन बनेगा करोड़पति 12' सह कमबॅक करण्यासाठी अमिताभ बच्चन सज्ज Watch Video)
दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या दोन्ही भावांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यानंतर दोघांनाही मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 97 वर्षीय दिलीपकुमार यांचे दोन भाऊ अहसान खान आणि अस्लम खान यांना कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.