कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्व स्तरातून मदत केली जात आहे. याच दरम्यान आता बॉलिवूड मधील अभिनेता जॅकी भगनानी याचे मुंबई महापालिकेने आभार मानले आहेत. कारण जॅकी याने वांद्रे, खार आणि सांताक्रुझ मधील कोविड सेंटर्ससाठी राशन दान केले आहे. जॅकी याचे आभार मानत महापालिकेने ट्वीट करुन असे म्हटले आहे की; वांद्रे, खार आणि सांताक्रुझ मधील क्वारंटाइन सेंटर्स आणि कोविड19 च्या रुग्णांसाठी केलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी आम्ही आभारी आहोत. तुमच्या खऱ्या आणि निरंतर प्रयत्नांना मान देतो.
जॅकीने यावर ट्वीट करत असे म्हटले आहे की, ही गोष्ट मी तर करु शकतोच. त्याचसोबत महापालिकेच्या संपूर्ण टीमची प्रशंसा करतो.(सोनू सूदने आपला शब्द पाळला; गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सुरु होणार पुण्यातील Warrior Aaji शांताबाई पवार यांचे ट्रेनिंग सेंटर)
This is the least I could do 🙏 Kudos to @mybmc and the entire team for the splendid efforts. @mybmcWardHW @VVVispute @iqbalsinghchah2 https://t.co/JafYbSEud6
— Jackky Bhagnani (@jackkybhagnani) August 27, 2020
यापूर्वी सुद्धा जॅकी याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना 1 हजारांहून अधिक पीपीई किट्स दान केले होते. ज्यावेळी जॅकी याला कळले की, हे अधिकारी किट्स शिवाय काम करत आहेत त्यानंतर त्याने तातडीने ते दान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत जॅकीने ऑल इंडिया फिल्म टेलिव्हिजन अॅन्ड इव्हेंट्स डान्सर्स असोसिएशन मधील 600 हून अधिक डान्सर्सच्या परिवाराच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे.