अभिनेता सनी देओल यांनी केला भाजप प्रवेश
Sunny Deol (Photo Credits-ANI)

बॉलिवूड मधील दिग्गज अभिनेता सनी देओल (Sunny Deol) ह्याने आज (23 एप्रिल) भाजप (BJP) पक्षात प्रवेश केला आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी सनी देओल ह्याचे पक्षप्रवेशामुळे अभिनंदन केले आहे. तसेच पियुष गोयल सुद्धा यावेळी उपस्थित होते. तर गुरदासपुर येथील लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना तिकिट देण्यात येईल अशी शक्यता बाळगली जात आहे.

तर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी यापूर्वी भाजप पक्षात प्रवेश केला होता. तर आता सनी देओल ह्याने भाजपपक्षात प्रवेश केला आहे. तर नुकताच सनी देओलचा भाजप पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सनी देओल भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असल्याचा अंदाज लावला जात होता.(हेही वाचा-दिल्ली: अभिनेता सनी देओल काही वेळातच भाजप पक्षात प्रवेश करणार)

तर धमेंद्र यांना 2004 मध्ये भाजप पक्षाकडून बीकानेर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा तेथे विजय मिळाला होता. तसेच हेमा मालिनी सुद्धा मथुरा येथून उमेदवारी देण्यात आली असून यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.