दिल्ली: अभिनेता सनी देओल काही वेळातच भाजप पक्षात प्रवेश करणार
Sunny Deol (Photo Credits-Facebook)

बॉलिवूड मधील दिग्गज अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आता राजकरणात उतरणार असल्याची चर्चा रंगली आहे. तर काही वेळातच सनी देओल आज (23 एप्रिल) भाजप (BJP) पक्षात प्रवेश करणार आहे. तर गुरदासपुर येथील लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना तिकिट देण्यात येईल अशी शक्यता बाळगली जात आहे.

तर सनी देओल ह्याचे वडिली धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचे राजकरणाशी जुने नातेसंबंध आहेत. तर आता सनी देओल ह्याला भाजपकडून उमेदवारी देण्यात येईल अशी शक्यता आहे. तसेच अमृतसर येथून हरदीप पुरी ह्याला उमेदवारी देण्यात आली. परंतु गुरुदापूर येथून भाजप पक्षाकडून उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे सनी देओल ह्याला येथे तिकिट मिळण्याची शक्यता आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश)

तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बॉलिवूड मधील काही दिग्गज मंडळींनीसुद्धा भाजप पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. तर जया प्रदा. ईशा कोप्पीकर, मौसमी चौधरी आणि रवि किशन यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे.