Kriti Kharbanda and Pulkit Samrat Celebrate Holi: आज देशभरात रंगांचा सण, होळी (Holi 204) साजरा केला जात आहे. हा सण साजरा करण्यात बॉलिवूड सेलिब्रिटीही मागे राहिले नाहीत. होळीशी बॉलीवूडचा अतूट संबंध आहे. या वर्षी अशी अनेक जोडपी आहेत ज्यांनी लग्नानंतरची पहिली होळी साजरी केली. ही यादी बरीच मोठी आहे आणि या यादीत बॉलीवूड स्टार जोडपे क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda) आणि पुलकित सम्राट (Pulkit Samrat) यांचाही समावेश आहे. त्यांची पहिली होळी पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. आता आपल्या चाहत्यांसाठी या जोडप्याने त्यांच्या होळी सेलिब्रेशनचे फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
क्रिती खरबंदाने पती पुलकित सम्राटसोबत त्यांच्या मुंबईतील घरी होळी साजरी केली. फोटोंमध्ये क्रिती आणि पुलकितच्या चेहऱ्यावर गुलाल लावलेला दिसत आहेत. पहिल्या होळीचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. यावेळी पुलकितने पत्नीवर प्रेमाचा वर्षाव केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'आमची पहिली होळी.' (हेही वाचा - Holi 2024: दिशा पटानीने टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारसोबत साजरी केली होळी, व्हिडीओ व्हायरल)
दरम्यान, यावेळी क्रिती खरबंदाने पांढऱ्या फ्लोरल सूट परिधान केला होता. रंगाने भरलेली अभिनेत्री खूपचं क्यूट दिसत होती. त्याच वेळी, अभिनेता पुलकीतनेही फिकट गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केलेला दिसत आहे. या पोस्टवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'किती सुंदर जोडप आहे.' आणखी एका यूजरने लिहिले, 'तुम्हा दोघांना होळीच्या शुभेच्छा. तुम्ही एकत्र खूप क्यूट दिसत आहात.' याशिवाय अनेक चाहत्यांनी या जोडप्याला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
तथापी, पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांनी 15 मार्च रोजी मानेसर येथील ग्रँड आयटीसी भारत रिसॉर्टमध्ये पंजाबी रितीरिवाजांनुसार लग्न केले होते.