Zero Song Husn Parcham : Katrina Kaif च्या बोल्ड अंदाजातील 'हुस्न परचम' गाणं रसिकांच्या भेटीला !
'हुस्न परचम' (Photo Credits: Youtube)

Zero Song Husn Parcham :  शाहरूख खानच्या (ShahRukh Khan ) आगामी झिरो (Zero) या सिनेमातील हुस्न परचम (Husn Parcham) हे बहुप्रतिक्षित गाणं आज रीलीज करण्यात आलं आहे. या गाण्यामध्ये अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) बोल्ड अंदाजातून रसिकांच्या भेटीला आली आहे. काही दिवसांपूर्वी या गाण्याचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. आयटम नंबरच्या स्वरूपात असणार्‍या या गाण्याची तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.

शाहरूख खान, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ झिरो या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. 'हुस्न परचम' या गाण्याचं संगीत दिग्दर्शन मराठमोळी संगीतकार जोडी अजय अतुल यांनी केलं आहे. भूमी त्रिवेदी (Bhoomi Trivedi)आणि राजा कुमारी (Raja Kumari )या जोडीने हे गाणं गायलं आहे. कॅटरिना कैफ या सिनेमात बबिता कुमारी हे पात्र सकारत आहे. हुस्न परचम गाण्यामध्ये तिच्या सिझलिंग डांस मुव्ह्स, ठेक्यावर सहज नाचायला लावणारी गाण्याची चाल,बोल्ड अंदाज  यामुळे हे गाणं लोकांच्या पसंतीला उतरेल अशी अपेक्षा आहे.

झिरो सिनेमातील यापूर्वी इस्सकबाजी’ (Issaqbaazi) आणि मेरे नाम तू (Mere Naam Tu) ही गाणी रिलिज करण्यात आली. या गाण्यांनादेखील रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. प्रथमच शाहरूख खान रूपेरी पडद्यावर एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकरणार आहे. आनंद एल राय दिग्दर्शित झिरो सिनेमा 21 डिसेंबरला हा रिलीज होणार आहे.