Zero Song Mere Naam Tu: शाहरुख खान आणि अनुष्काचं रोमँटिक अंदाजातील सिनेमाचं पाहिलं गाणं रसिकांच्या भेटीला
zero-song- Photo Credit: Youtube

Zero Song Mere Naam Tu:  शाहरुख खानचा (Shahrukh Khan) आगामी चित्रपट झिरो (Zero) सिनेमाची सध्या हटके प्रमोशनमुळे खूपच चर्चा रंगली आहे. आज शाहरुख आणि अनुष्का शर्मावर चित्रित केलेलं पाहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. 'मेरे नाम तू' (Mere Naam Tu) हे गाणं सोशल मीडियाद्वारा प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे चित्रपटातील एक रोमँटिक गाणं आहे. अभय जोधपूरकर या नव्या दमाच्या गायकाने हे गाणं गायलं आहे. या गाण्याचं संगीत दिगदर्शन अजय-अतुल या मराठमोठ्या लोकप्रिय संगीतकार जोडीने केलं आहे.

शाहरुख खान(Shahrukh Khan)  या सिनेमात बाउआ सिंग हे पात्र साकारत आहे. सध्या ट्विटर अकाऊंट पासून ते Zero Whats app Stickers पर्यंत त्याची धूम सर्वत्र पाहायला मिळत आहे. शाहरुख सोबत या सिनेमात अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ प्रमुख भूमिकेत आहेत. 21  डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. Zero Trailer : वाढदिवसादिवशी शाहरुख खानने दिले चाहत्यांना रिटर्न गिफ्ट

बाउआ सिंग या एका बुटक्या पात्रात शाहरुख खान रसिकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी अनुष्का आणि शाहरुख या जोडीचा 'जब हैरी मेट सजल' (Jab Harry Met Sejal) सिनेमा रिलीज झाला होता. मात्र त्याने बॉक्सऑफिसवर फारशी कमाई केली नव्हती. आता नव्या सिनेमात त्यांची केमेस्ट्री बॉक्सऑफिसवर कामगिरी कशी करतेय ?हे पाहण उत्सुकतेचं ठरणार आहे. झिरो सिनेमाला ख्रिसमस विकेंड मिळावा याकरिता रितेश देशमुखच्या 'माउली' सिनेमाच्या रिलीज डेटमध्येही बदल करण्यात आले आहेत.