Zero Whats app Stickers : आता बाऊआ सिंगच्या भाषेतच करा चॅटिंग, कशी डाऊनलोड कराल स्टिकर्स ?
zero whats app stickers (File Image)

Zero Whatsapp Stickers : शाहरुख खान (Shahrukh Khan)  लवकरच Zero सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. झिरो सिनेमाच्या प्रमोशनसाठी वेग वेगवेगळे प्रमोशन फंडे वापरले जात आहेत. ट्विटरवर शाहरुख खान साकारत असलेल्या बाऊआ सिंगच्या नावाने अकाउंट बनवले आहे. शाहरुख आणि बाउआ सिंगमध्ये अनेक मजेशीर गप्पा देखील होतात. सिनेमाच्या ट्रेलरनेदेखील सारे विक्रम मोडीत काढले आहेत. २४ तासातच या सिनेमाच्या ट्रेलरला ५४ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. नुकताच ट्रेलर पाठोपाठ या सिनेमाचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. प्रोमोतील बाउआ सिंगचा अंदाजही लोकांना आवडला आहे.

ट्विटर पाठोपाठ आता बाउआ सिंग व्हॉट्सअपवरही आला आहे. Whatsapp Stickers च्या माध्यमातून तुम्ही आता चॅट करू शकणार आहात. नुकताच Whatsapp Stickers पॅक लॉन्च करण्यात आला आहे. प्ले स्टोअर वरून तुम्ही हा पॅक डाऊनलोड करू शकणार आहात. रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या ट्विटर अकाऊंटद्वारा त्याची लिंक शेअर करण्यात आली आहे. अशाप्रकारे Whatsapp Stickers लॉन्च करणारा झिरो हा पहिलाच सिनेमा आहे.

आनंद एल राय दिग्दर्शित झिरो सिनेमामध्ये शाहरुख खानसोबत अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार आहेत. हा सिनेमा २१ डिसेंबरला रिलीज होणार आहे.