Zero Promo : शाहरुख खानच्या पुन्हा प्रेमात पडायला भाग पाडेल 'हा' नवा प्रोमो ! (Video)
झिरो प्रोमो Phooto credit :twitter

Zero Promo : शाहरुख खानचा (Shahrukh Khan ) आगामी सिनेमा झिरो (Zero) आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. दमदार ट्रेलरनंतर आता या सिनेमाचा प्रोमो लॉन्च करण्यात आला आहे. सिनेमाचा प्रोमो हा ट्रेलरप्रमाणेच असला तरीही या प्रोमोमधला शाहरुख खानचा एक डायलॉग भाव खाऊन जातोय. रोमान्स किंग शाहरुख खानने झिरोच्या या प्रोमोमध्ये एक लव्ह मंत्र शेअर केला आहे.

Zero चा प्रोमो

शाहरुख खान या सिनेमामध्ये बाऊवा सिंगचं पात्र साकारत आहे. " न हम स्वीट है, न क्यूट है, न ही हमको गिटार बजाना आता है...हम जैसे लड़को से देखकर प्यार नहीं होता बहनजी, देखते देखते हो जाता है." हा डायलॉग या प्रोमोचं खास आकर्षण आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंटने हा प्रोमो ट्विटरवर शेअर केला आहे.  Zero Trailer : वाढदिवसादिवशी शाहरुख खानने दिले चाहत्यांना रिटर्न गिफ्ट, पाहा व्हिडीओ

झिरो(Zero) सिनेमामध्ये शाहरुख खानसोबत कॅटरिना कैफ (Katrina Kaif)  आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma ) प्रमुख भूमिकेत आहे. झिरो (Zero)  हा सिनेमा 21  डिसेंबरला रिलीज होणार आहे. ख्रिसमसच्या विकेंडला हा सिनेमा रिलीज होणार असल्याने बॉक्सऑफिसवर तो किती कमाई करतोय याकडे विशेष लक्ष लागले आहे.