Kareena Kapoor Khan ने पहिल्यांदाच शेअर केली तिच्या नवजात बालकाची झलक;  Women’s Day दिवशी पहा तिचा क्यूट अंदाज!
करिना कपूर खान । Photo Credits: Instagram

बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) काही दिवसांपूर्वीच दुसर्‍यांदा आई झाली आहे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तिने आपल्या नवजात बाळासोबतचा एक फोटो क्लिक करत महिला शक्तीला सलाम करत इंटरनॅशंल वूमन्स डे (International Womme's Day) च्या शुभेच्छा दिल्या आहे. पतोडी कुटुंबातील या नव्या नवाबाची झलक पाहण्याची करिनाच्या चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता आहे. दरम्यान आज त्यांना त्याची काहीशी झलक पहायाला मिळाली आहे.

सध्या कामातून ब्रेक घेत आईपण पुन्हा जगत असलेल्या करिना कपूर खान ने बाळासोबतचा फोटो शेअर करताना ' महिला करू शकत नाही अशी कोणतीच गोष्ट नाही' असं म्हणत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करिनाच्या या इंस्टाग्राम वरील फोटोवर अनेक सेलिब्रिटींनीदेखील कौतुकाचा वर्षाव करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Kareena Kapoor Khan च्या नव्या चिमुकल्याची पहिली झलक आली समोर; तैमुर, सैफ सह हॉस्पिटल मधून घरी परतली (Watch Video).

करिना कपूर खानचा फोटो

सैफ आणि करिना कपूरच्या या दुसर्‍या मुलाचा जन्म 21 फेब्रुवारी 2021 दिवशी मुंबईच्या ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल मध्ये झाला आहे. तैमुर या सैफिनाच्या मोठ्या मुलाची सोशल मीडियामध्ये तुफान फॅन फॉलोविंग आहे. त्याच्या निरागस मुद्रा टिपण्यासाठी पॅपराझींची देखील मोठी गर्दी असते.

गरोदर पणाच्या काळातही करिना कपूर खानने तिचं काम आणि फीटनेस मंत्रा कायम ठेवला होता. तिच्या गरोदरपणाच्या शेवटच्या काळातही तिने योगासनं करतानाचे काही व्हिडिओ, फोटोज शेअर केले होते. त्यामुळे आज करिना अनेकींसाठी आदर्श आहे.