Kareena Kapoor Khan च्या नव्या चिमुकल्याची पहिली झलक आली समोर; तैमुर, सैफ सह हॉस्पिटल मधून घरी परतली (Watch Video)
आज सकाळीच करिना गाडीमध्ये बसून नवजात बालकासह घरी रवाना झाली आहे. सध्या सोशल मीडियामध्ये खान कुटुंबियांचे हे फोटोज आणि व्हिडिओ झपाट्याने वायरल होत आहेत.
करिना कपूर खानला (Kareena Kapoor Khan) तिच्या मुलांसह ब्रीज कॅण्डी हॉस्पिटल मधून सुट्टी मिळाली आहे. आज सकाळी सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि तैमुर अली खान (Taimur Ali Kahan) देखील हॉस्पिटलच्या बाहेर स्पॉट झाले आहेत. आज सकाळीच करिना गाडीमध्ये बसून नवजात बालकासह घरी रवाना झाली आहे. सध्या सोशल मीडियामध्ये खान कुटुंबियांचे हे फोटोज आणि व्हिडिओ झपाट्याने वायरल होत आहेत. अद्याप करिनाच्या नव्या चिमुकल्याचा फोटो किंवा झलक समोर आलेली नाही. तैमुर नंतर आता करिनाच्या नव्या बाळाला पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. It’s a Boy for Kareena Kapoor and Saif Ali Khan: करीना-सैफच्या घरी पुन्हा छोट्या नवाबाचे आगमन; बॉलिवूडच्या 'या' कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव.
रविवार 21 फेब्रुवारी दिवशी करिनाने दक्षिण मुंबई मधील ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल मध्ये बाळाला जन्म दिला आहे. सैफ अली खानने मुलाच्या जन्मानंतर गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर करताना करिना आणि मुलगा दोघेही सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. तसेच चाहत्यांनी दाखवलेल्या प्रेमासाठी आभार देखील मानले आहेत.


View this post on Instagram
दरम्यान करिना कपूर खान ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तैमुर प्रमाणेच दुसर्या मुलाच्या वेळेसही गरोदर असताना करिना कपूर खान काम करताना दिसली. कोविड 19 च्या काळात पुरेशी काळजी घेत तिने अमिर खान सोबत एका सिनेमाचं शूटिंग पूर्ण केले. काही जाहिरातींमध्ये झळकली. वेब शोजसाठी काम केले. तसेच प्युमा साठी देखील काम करताना दिसली.
(The above story first appeared on LatestLY on Feb 23, 2021 01:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

