It’s a Boy for Kareena Kapoor and Saif Ali Khan: करीना-सैफच्या घरी पुन्हा छोट्या नवाबाचे आगमन; बॉलिवूडच्या 'या' कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Kareena and Saif (Photo Credits: Instagram)

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफअली खान (Saif Ali Khan) यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. शनिवारी रात्री करीना कपूरला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर करीना कपूरची आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास प्रसुती झाली. करीना कपूर दुसऱ्यांदा आई झाली झाली आहे. करीना-सैफच्या घरात नवा पाहुणा आल्याने मनीष मल्होत्रा (Manish Malhotra), रिद्धिमा (Riddhima Kapoor), सबा पटौदी (Saba Pataudi) यांच्यासह त्यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

करीना-सैफच्या दुसऱ्या बाळासाठी चाहत्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. दरम्यान, करीनाच्या अनेक चाहत्यांनी तिच्या घरी भेट म्हणून खेळणीदेखील पाठवून दिली होती. चाहत्यांची ही प्रतिक्षा अखेर संपली आहे. सोशल मीडियावरुन चाहत्यांनी सैफ करीनाला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. हे देखील वाचा- Kareena Kapoor Khan Blessed With A Baby Boy: लहान भावाला पाहण्यासाठी तैमूर हॉस्पिटलमध्ये दाखल; पहा Cute Photo

ट्वीट-

फोटो-

ट्वीट-

फोटो-

यापूर्वी 2016 मध्ये करीना जेव्हा पहिल्यांदा गर्भवती होती, तेव्हा तिने त्या कालावधीत काम करण्याचा खूप आनंद घेतला होता.दरम्यानच्या काळात तिने अनेक जाहिरातींचे चित्रीकरणदेखील केले होते. बेबी बंपसह करिनाने रॅम्प वॉकदेखील केला होता. त्यावेळी तिचा हा रॅम्प वॉक अतिशय प्रसिद्ध झाला होता. एवढेच नव्हेतर, करीनाने दुसऱ्या बाळाच्या गरोदरपणातही शेवटपर्यंत काम केले आहे. याकाळातही करीना अनेक इव्हेंट्सला हजर राहत होती. ती दोन दिवसांपूर्वीच अमृता अरोराच्या प्री ख्रिसमस बॅशमध्ये सहभागी झाली होती.