Kareena Kapoor Khan Blessed With A Baby Boy: लहान भावाला पाहण्यासाठी तैमूर हॉस्पिटलमध्ये दाखल; पहा Cute Photo
Taimur Ali Khan Spotted Outside the Hospital (Image Credit: Yogen Shah)

कपूर आणि खान कुटुंबात सध्या प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. आज सकाळी करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. काल रात्री तिला मुंबईतील ब्रीज कँन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी ही गुडन्यूज सर्वांसोबत शेअर करण्यात आली. आनंदाच्या या बातमीनंतर करीना कपूर आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान,  तैमुर अली खान (Taimur Ali Khan) देखील आपल्या छोट्या भावाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला.

ब्रीच कँन्डी हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या पॅपराजीच्या कॅमेऱ्यातून तैमूर सुटला नाही. गाडीत मास्क लावून बसलेल्या छोट्या तैमुरची छबी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Kareena Kapoor Khan आणि Saif Ali Khan यांना पुत्ररत्न; दुसऱ्यांदा आई झाली करीना कपूर)

Taimur Ali Khan Spotted Outside the Hospital (Image Credit: Yogen Shah)

ऑगस्ट 2020 मध्ये दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याची बातमी सैफीनाने चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर करीनाच्या प्रेग्नेंसीबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता होती. तसंच प्रेग्नेंसी दरम्यान करीना कपूर ने फॅशन टीप्ससह डाएट, व्यायाम यासंबंधित पोस्ट करत अनेकांनी प्रोत्साहीत केले आहे.

करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी 2012 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर 20 डिसेंबर 2016 रोजी सैफीनाला पहिली अपत्यप्राप्ती झाली. तैमूर 4 वर्षांचा झाल्यानंतर आज पुन्हा एकदा दोघांच्या आयुष्यात एक नवा पाहुणा आला आहे. दरम्यान, तैमूर हा अत्यंत लोकप्रिय स्टारकीड असून त्याची सोशल मीडियात प्रचंड चर्चा असते. त्यामुळे आता नव्या बाळालाही तितकेच मीडिया अन्टेशन मिळणार का, याची उत्सुकता आहे.