Kareena Kapoor Khan आणि Saif Ali Khan यांना पुत्ररत्न; दुसऱ्यांदा आई झाली करीना कपूर
Kareena and Saif (Photo Credits: Instagram)

पुन्हा एकदा एकदा पटौदी कुटूंबात आनंदाची लाट पसरली आहे. अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) आज पुन्हा एकदा पालक बनले आहेत. बेगम करीनाने आज तिच्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला आहे. ही गोड बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली आहे. शनिवारी रात्रीच करीना कपूर खानला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी पहाटे तिने मुलाला जन्म दिला आहे. या बातमीनंतर करीना कपूर आणि सैफ अली खान यांचे चाहते तसेच इतर सेलेब्जही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये करीना कपूरने तिच्या दुसऱ्या गरोदरपणाविषयी माहिती दिली होती.

सैफ अली खानने 16 ऑक्टोबर 2012 रोजी करीना कपूरसोबत एका प्रायव्हेट सोहळ्यात लग्न केले होते. यानंतर, 2016 मध्ये करीनाने आपला पहिला मुलगा मुलगा तैमूर अली खानला जन्म दिला. तैमूरच्या नावावरून बरेच वादंग झाले, पण नंतर जवळजवळ सर्वजण त्याचे चाहते झाले. आता तैमुर मोठा भाऊ झाला आहे. या बातमीनंतर कुटुंबातील सर्व सदस्य खूप आनंदी आणि नव्या पाहुण्याला घरी आणण्यासाठी खूप उत्सुक आहेत. कुटुंबात यापूर्वी याबाबत खूप तयारी केली गेली होती. करीना कपूर आणि बाळ दोघेही ठीक आहेत. (हेही वाचा: शशांक केतकर झाला बाबा! पत्नी प्रियांका ढवळे ने दिला गोंडस मुलाला जन्म)

दरम्यान, प्रेग्नन्सीमध्ये करिना कपूर खानची स्टाईल अगदी ऑनपोइंट होते. ती अगदी फुलांच्या गाऊनपासून ते कुर्ता-पायजामापर्यंत दिसली होती. याशिवाय करीना, सैफ आणि तैमूरसुद्धा त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. काही दिवसांपूर्वी करीना कपूर खानने इंस्टाग्रामवर नवीन घराच्या अलिशान बेडरूमचे अनेक फोटो शेअर केले होते.