शशांक केतकर झाला बाबा! पत्नी प्रियांका ढवळे ने दिला गोंडस मुलाला जन्म
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर याच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. शशांकने हे गुडन्यूज इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे. बाळासोबतचा फोटो शेअर करत शशांकने बाळाचे नावही जाहीर केले आहे
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) याच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. पत्नी प्रियांका ढवळे (Priyanka Dhavale) ने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. शशांकने हे गुडन्यूज इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे. बाळासोबतचा फोटो शेअर करत शशांकने बाळाचे नावही जाहीर केले आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकाल, शशांकच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत आहे. मात्र चिमुकल्याच्या चेहरा दिसत नाही. 'ऋग्वेद शशांक केतकर' असे कॅप्शन देत हार्ट इमोजीसह शशांकने हा फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
यापूर्वी शशांकने 25 डिसेंबर ख्रिसमसच्या दिवशी पत्नी प्रियांका सोबतचा खास फोटो शेअर करत तो बाबा होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर त्याच्यावर चहुबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. आता देखील पुत्ररत्न प्राप्तीनंतर त्याच्या पोस्टवर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.
पहा फोटो:
View this post on Instagram
'होणार सून मी या घरची' या मालिकेतून शशांक केतकर घराघरात पोहचला. त्यानंतर 'सुखांच्या सरींनी हे मन बावरे', 'इथेच टाका तंबू', 'नकटीच्या लग्नाला यायचं हा..' या मालिकांमध्येही त्याने काम केले. याशिवाय '31 दिवस', 'आरॉन', 'वन वे तिकीट' या सिनेमातूनही तो झळकला होता. आता लवकरच तो झी मराठी वरील 'पाहिले न मी तुला' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, शशांक सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून पत्नीसोबतचे खास फोटोज तो शेअर करत असतो. शशांक-प्रियांकाच्या जोडीला चाहत्यांकडूनही भरभरुन प्रेम मिळते.
(The above story first appeared on LatestLY on Feb 21, 2021 11:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

