'मणिकर्णिका' सिनेमासाठी कंगना रानौतने घेतले 'इतके' मानधन ; दीपिका, प्रियंकालाही टाकले मागे
कंगना रानौत (Photo Credits: File Photo)

बॉलिवूड क्वीन कंगना रानौत सध्या तिचा आगामी सिनेमा 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' मुळे चर्चेत आहे. तिचा हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सिनेमाचे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी कंगना मेहनत घेत आहे. मात्र आता कंगनाच्या मानधनावरुन चर्चा रंगू लावल्या आहेत. कंगनाने या सिनेमासाठी भारीभक्कम मानधन घेतल्याचे समजतेय. आतापर्यंत दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्रा या अभिनेत्री एका सिनेमासाठी 10 कोटींहून अधिक मानधन घेत असल्याचे ऐकले होते. पण त्यांनाही मागे टाकत कंगनाने या सिनेमासाठी 10 कोटींहून अधिक मानधनाची मागणी निर्मात्यांकडे केली होती.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मणिकर्णिका सिनेमासाठी कंगनाने तब्बल 14 कोटी रुपये मानधन घेतले आहे. कंगना प्रत्येक सिनेमात भूमिकेनुसार मानधनाची मागणी करते. यावेळेस मात्र तिने सर्वाधिक मानधन घेतले आहे.

कंगना रानौत (Photo Credits: File Photo)

या सिनेमासाठी कंगनाने घोडेस्वारी, तलवारबाजी शिकली. त्यानंतर दिग्दर्शक क्रिश यांनी सिनेमातून हात काढून घेतल्यावर कंगनाने दिग्दर्शनाची सुत्रंही सांभाळली. हा सिनेमा 25 जानेवारी 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.