अभिनेत्री कल्की कोचलीन हिला कन्यारत्न प्राप्त; लग्नाआधीच मिळालं आईपण
Kalki Koechlin (Photo Credits-Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन (Kalki Kochelin) हिने काल, शुक्रवारी रात्री एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे, मागील काही काळात कल्कीचा गरोदरपण हा चर्चेचा विषय ठरला होता, आता मात्र ही गोड बातमी कळताच अनेकांनी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे कल्की मागील दोन वर्षांपासून गाय हर्शबर्ग या आपल्या प्रियकरासोबत सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहते आहे मात्र अद्याप त्यांनी लग्न केलेले नाही, काही महिन्यापूर्वी तिने आपण गरोदर असल्याची माहिती आपल्या फॅन्सना दिली होती, त्यावेळी लग्न न करताच गरोदर असलेल्या कल्कीला काहींनी ट्रोल केले होते, मात्र मी गरोदर आहे पण केवळ त्यासाठी लग्न करणार नाही अशी भूमिका घेत कल्कीने कुमारी माता बनण्याचा निर्णय घेतला होता, मधल्या काळात नेहमी ऐकवल्या जाणाऱ्या सर्व ट्रोल्सकडे दुर्लक्ष करत कल्की आपल्या मतावर ठाम राहिली होती. प्रेग्नंट कल्की कोचीन ला पाहून करीना ला झाली आपल्या गरोदरपणाची आठवण, दिली अशी मिश्किल प्रतिक्रिया

कल्कीच्या गरोदरपणात तिने अनेकदा आपलय बेबी बंप सोबत स्टायलिश फोटो शूट केले होते, तिचे हे फोटो पाहून तिने आपले गरोदरपण किती एन्जॉय केले असेल याचा सहज अंदाज येतो.

कल्की कोचलीन बेबी बम्प फोटो

दरम्यान, कल्की ही मागील अनेक वर्ष बॉलिवूड मध्ये काम करतेय, तिचे अनेक चित्रपट हे हिट सुद्धा ठरले आहेत, मात्र त्याहीपेक्षा ती नेहाचं स्वतःच्या वयक्तिक आयुष्यामुळे आणि बोल्ड मतांमुळे चर्चेत राहिली होती, यापूर्वी तिचा दिग्दर्शक अनुराग कश्यप सोबत विवाह झाला होता, मात्र कालांतराने दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि आता आपला बॉयफ्रेंड गाय हर्शबर्ग याच्यासोबत तिने लग्नाअगोदरच पालक बनण्याचा अनुभव घेतला आहे.