Amit Sadh: 'काई पो छे' स्टार अमित साध ने 4 वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न; मुलाखतीत मोठा खुलासा
अमित साध (Photo Credits: Instagram)

Amit Sadh: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) च्या निधनानंतर अनेक खुलासे समोर आले आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून देशातील बड्या एजन्सी सुशांतच्या आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सुशांत सिंग राजपूत यांच्याबरोबर 'काई पो छे' (Kai Po Che) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये नाव कमावणाऱ्या अमित साधनेही (Amit Sadh) आत्महत्येप्रकरणी मोठा खुलासा केला आहे. वास्तविक, अमित साध यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, त्यानेही 4 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अमितने 16 ते 18 वर्षांच्या दरम्यान आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

अमित साधने Mens XP ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, 'एक दिवस मी अचानक उठलो आणि पुन्हा पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण देवाच्या कृपेने चौथ्या प्रयत्नांनंतर मला लक्षात आलं, हा योग्य मार्ग नाही आणि माझा शेवट हा असू शकत नाही. ज्यानंतर सर्व गोष्टी बदलल्या. मी माझा विचार बदलला. ज्यानंतर मी कधीही हार न मानण्याचे सूत्र अनुसरण करण्यास सुरुवात केली. (हेही वाचा -Sana Khan Shares First Wedding Photo: लग्नानंतर सना खानने पती अनस सय्यदबरोबर शेअर केला फोटो; Watch Photo)

 

View this post on Instagram

 

A post shared by AMIT SADH (@theamitsadh)

अमित साध यांच्या म्हणण्यानुसार, आयुष्य म्हणजे एक भेट आहे हे समजण्यासाठी त्याला 20 वर्षे लागली. त्यामुळे मुक्तपणे जगले पाहिजे. अमित साधने टीव्ही ते बॉलिवूडपर्यंत अनेक प्रोजेक्टवर काम केलं आहे. त्याच्या नुकत्याच रिलीझ झालेल्या वेब शृंखला ब्रीद: इनटू द शॅडो मधील त्याच्या कामाचे प्रेक्षकांनी भरपूर कौतुक केले.