Sana Khan Shares First Wedding Photo: लग्नानंतर सना खानने पती अनस सय्यदबरोबर शेअर केला फोटो; Watch Photo
Sana Khan Wedding Photo (Image Credit: Instagram)

Sana Khan Shares First Wedding Photo: बॉलिवूड अभिनेत्री सना खान (Sana Khan) ने ग्लॅमरस जगाला निरोप दिला असला, तरी सोशल मीडियावर तिच्यासंदर्भातील बातम्यांची नेहमीचं चर्चा असते. 20 नोव्हेंबरला सना खानने मुस्लिम धर्मगुरु मुफ्ती अनस सय्यदसोबत लग्नानंतर पहिला फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सना खान लाल रंगाच्या लेहेंग्यामध्ये दिसत आहे. खरं तर, यापूर्वी सना खानचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती व्हाइट कलरचा पोशाख परिधान करताना दिसली होती. त्यानंतर तिच्या लग्नाच्या बातम्या व्हायरल झाल्या.

दरम्यान, आता सना खानने लग्नानंतर पहिला फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अनस पांढर्‍या रंगाच्या शेरवानीत दिसत आहे तर सना खान लाल रंगाच्या जोड्यांमध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करताना सना खानने इन्स्टाग्रामवर म्हटलं आहे की, “अल्लाहसाठी एकमेकांवर प्रेम केलं, अल्लाहसाठी एकमेकांशी लग्न करा, अल्लाह आम्हाला या जगात आणि स्वर्गात एकत्र राहुदे." (हेही वाचा -Prabhu Deva दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात; मुंबईमधील फिजिओथेरपिस्ट डॉ. हिमानीशी मे महिन्यात पार पडला लग्नसोहळा )

 

View this post on Instagram

 

A post shared by Sayied Sana Khan (@sanakhaan21)

33 वर्षीय सना खानने ऑक्टोबरमध्ये सांगितले होते की, तिने चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला असून यापुढे ती मानवतेसाठी आपले जीवन समर्पित करील आणि विधात्याच्या आदेशाचे पालन करेल.

सना खानने 2005 मध्ये "यही है हाई सोसाइटी" मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर तिने "हल्ला बोल", "जय हो", "वजह तुम हो" आणि "टॉयलेट: एक प्रेम कथा" चित्रपटामध्ये भूमिका केली होती.