अभिनेता, दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक प्रभु देवा (Prabhu Deva) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकताच तो पुन्हा एकदा लग्न करणार असल्याचे बोलले जात होते. आता ताज्या बातम्यांनुसार प्रभुदेवाने दुसरे लग्न केले आहे. त्याने मुंबईतील फिजिओथेरपिस्टला आपला जीवनसाथी बनवले आहे. प्रभुदेवाचा भाऊ राजू सुंदरम यांनी त्याच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राजू सुंदरम म्हणाले की, लॉकडाऊन दरम्यान प्रभु देवाचे लग्न मुंबई येथील फिजिओथेरपिस्ट हिमानी (Himani) हिच्याशी झाले. प्रभू देवा जेव्हा आपली पाठ आणि पायांवर उपचार घेत होता तेव्हा त्याची भेट डॉ हिमाणीशी झाली होती.
याआधी बातमी आली होती की, प्रभु देवा आपल्या भाचीच्या प्रेमात पडला असून त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आता त्याच्यावर पडदा पडला आहे. उपचारादरम्यान प्रभू देवा आणि हिमानी चांगले मित्र झाले होते. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. लग्न होण्यापूर्वी दोघेही सुमारे दोन महिने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. लॉकडाऊनच्या नियमांमुळे प्रभू देवाचे लग्न चेन्नईत फक्त त्यांच्या कुटुंबाच्या उपस्थितीत झाले. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. हिमानी प्रभू देवाच्या कुटूंबाला फक्त दोनदा भेटली आहे, पहिल्यांदा जुलैमध्ये आणि नंतर ऑगस्टमध्ये.
दरम्यान, प्रभू देवाने पहिल्यांदा रामलथाशी लग्न केले होते. त्यानंतर तो दक्षिण भारतीय अभिनेत्री नयनतारासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आला होता. मीडिया रिपोर्टनुसार प्रभूदेवाचे पहिले लग्न अभिनेत्री नयनतारामुळे मोडले होते. जेव्हा नृत्यदिग्दर्शक प्रभुदेवाला डेटिंग करण्यास सुरवात केली तेव्हा नयनताराने प्रभू देवाला डेट करायला सुरुवात केली, तेव्हा तो तीन मुलांचा बाप होता. सप्टेंबर 2010 मध्ये प्रभु देवाने स्वत: नयनतारा आणि त्यांचे संबंध स्वीकारले होते. नयनतरा सध्या डायरेक्टर विग्नेश शिवनला डेट करत आहे. (हेही वाचा: Prabhu Deva करणार दुसरं लग्न? भाचीसोबत अफेअर्सच्या चर्चांना उधाण)
प्रभू देवा कोरिओग्राफर असण्यासोबत दिग्दर्शक, निर्माताही आहे. तमिळ आणि तेलगू व्यतिरिक्त त्याने वॉन्टेड, राउडी राठोड, आर राजकुमार आणि दबंग 3 यासह अनेक बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.