अभिनेते कादर खान यांचे निधन; बिग बींसह 'या' बॉलिवूड स्टार्संनी वाहिली श्रद्धांजली

अभिनेते कादर खान यांचे निधन; बिग बींसह 'या' बॉलिवूड स्टार्संनी वाहिली श्रद्धांजली
कादर खान (Photo Credits: Insatgram)

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते कादर खान (Kader Khan) यांचे आज निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून कादर खान यांची प्रकृती चिंताजनक असून यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता. त्यांना कॅनडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कॅनाडात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती मिळत आहे.

काल त्यांच्या निधनाची बातमी ऑल इंडिया रेडिओने ट्विट करत दिली. मात्र ही निव्वळ अफवा असल्याचे त्यांचा मुलगा सरफराज खान (Sarfaraz Khan) याने स्पष्ट केले होते.

आज मात्र त्यांच्या निधनाची बातमी आली आणि बॉलिवूडकरांवर शोककळा पसरली. अनेकांनी कादर खान यांच्या जाण्याचे दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी कादर खान यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करण्याचे आपल्या चाहत्यांना आवाहन केले होते. मात्र कादर खान यांच्या  निधनानंतर त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरुन न निघण्यासारखी असल्याचे अभिनेता अर्जुन कपूर याने म्हटले आहे.

तुम्ही आम्हाला एकत्र हसवलेत आणि रडवलेतही, असे बॉलिवूड दिग्दर्शक मधूर भंडारकर यांनी म्हटले आहे.

अभिनेता मनोज बाजपेयीने देखील कादर खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आम्हाला हसवल्याबद्दल तुमचे आभार, असे ट्विट केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले आहे.

'दीवाना मैं दीवाना,' 'दूल्हे राजा,' 'अखियों से गोली मारे,' 'दरिया दिल,' 'राजा बाबू,' 'कुली नंबर 1,' 'छोटे सरकार,' 'आंखें,' 'तेरी पायल मेरे गीत,' 'आंटी नंबर 1,' 'हीरो नंबर 1,' 'राजाजी,' 'नसीब' यांसारख्या सिनेमात त्यांनी काम केले होते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि जबरदस्त कॉमेडी सेन्सने त्यांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले.

Loading...