अभिनेते कादर खान यांच्या निधनाची सोशल मीडियात अफवा
कादर खान (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते कादर खान (Kader Khan) यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियात व्हायरल झाली. त्यानंतर अनेकांनी त्यांना सोशल मीडियातून श्रद्धांजली वाहली. मात्र त्यांच्या निधनाची बातमी ही निव्वळ अफवा असल्याचे त्यांचा मुलगा सरफराज खान (Sarfaraz Khan) याने स्पष्ट केले.

ऑल इंडिया रेडिओने (All India Radio) कादर खान यांच्या निधनाची बातमी ट्विट करुन दिली. त्यानंतर ही अफवा असल्याचे समजताच हे ट्विट हटवण्यात आले.

(Photo Credit : Twitter)

गेल्या काही दिवसांपासून कादर खान यांची प्रकृती चिंताजनक असून यांना श्वास घेण्याचा त्रास होत आहे. त्यांना कॅनडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कादर खान यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरुन आपल्या चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.