बॉलिवूड अभिनेता,लेखक कादर खान ( Kader Khan) यांचे दीर्घ आजारपणात कॅनडामध्ये निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते. . कॅनडातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लीयर पाल्सी डिसऑर्डर (Progressive Supranuclear Palsy Disorder) या आजारामुळे त्यांच्या मेंदूला कार्य करताना अडथळे येत होते. सोबतच त्यांना श्वास घेण्यासही अडथळा येत होता. कादर खान यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार कॅनडातील वेळेनुसार 31 डिसेंबरच्या संध्याकाळी सहा वाजता कादर खान यांचे निधन झाले. मागील 16-17 आठवडे कादर खान हॉस्पिटलमध्ये होते. दुपारी ते कोमामध्ये गेले त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. कादर खान यांच्यावर कॅनडामध्येच अंतिम संस्कार होणार आहेत.
Veteran actor & screenwriter Kader Khan passes away at the age of 81 in a hospital in Toronto, Canada pic.twitter.com/RUP9cq7SNn
— ANI (@ANI) January 1, 2019
कॅनडातील रुग्णालयात BiPAP व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. कादर खान गेली अनेक वर्षे त्यांचा मुलगा सरफराज आणि सून शाइस्ता यांच्यासोबत कॅनडा (Canada) येथे राहात आहेत. 2015 मध्ये आलेला चित्रपट 'दिमाग का दही'मध्ये त्यांनी काम केले होते. त्यानंतर रुपेरी पडद्यापासून कादर खान दुरावले होते. कादर खान यांचा जन्म काबूल येथे झाला. राजेश खन्ना यांच्या 'दाग' सिनेमातून 1973 साली पदार्पण झालं. कादर खान यांनी 300 हुन अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावत असल्याचे वृत्त पसरले होते. काल सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची बातमी आली होती. मात्र त्यांच्या मुलाने ही बातमी अफवा असल्याचे म्हटले होते. मात्र आज कादर खान यांना देवाज्ञा झाली आहे. विनोदी अभिनेता असूनही दमदार संवाद फेक ही त्यांच्या अभिनयाची खास विशेष ओळख होती.