Ananya Panday हिला भेटण्यासाठी पोहचला ईशान खट्टर,  फुलगुच्छ खरेदी करत असल्याच्या व्हिडिओ व्हायरल झाल्याने ट्रोल
इशान खट्टर (Photo Credits- Viral Bhayani)

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या ड्रग्ज प्रकरणामुळे अडचणींचा सामना करत आहे. तर अनन्या हिला 2 वेळा एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. आता येत्या सोमवारी सुद्धा तिची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे. पण बॉलिवूड मधील काही कलाकार असे आहेत ज्यांनी अनन्या हिला पाठिंबा दिला आहे. अनन्या हिच्या सोबत तिचे वडील चंकी पांडे सुद्धा वेळोवेळी दिसून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर अनन्या हिचा कथित बॉयफ्रेंड ईशान खट्टर (Ishaan Khattar) याने सुद्धा तिचा धीर दिला आहे. तो तिला नुकताच भेटण्यासाठी गेला होता. तत्पूर्वी तो एका ठिकाणी फुलगुच्छ खरेदी करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओ नंतर ईशान हा अनन्या हिच्या घरी जात असल्याचे बोलले जात आहे. यावरुन असा अंदाज बांधला जात आहे की, अनन्या हिच्या कठीण काळात ईशान हा तिला सपोर्ट करण्यासाठी पोहचला आहे. परंतु फुलगुच्छ खरेदी करत असल्याच्या व्हिडिओ नंतर त्याला ट्रोल केले जात आहे.(Drugs Case: एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी उशिरा पोहचलेल्या Ananya Panday हिला समीर वानखेडे यांनी फटकारले)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान, ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांची ऑन स्क्रिन जोडी भले सर्वांच्या पसंदीस पडली नाही. पण त्यांच्या खासगी आयुष्यात त्या दोघांना एकमेकांसोबत चाहत्यांना पहायचे आहे. तर 'खाली पीली' सिनेमात या दोघांनी एकत्रित काम केले आहे. त्यानंतर हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची ही चर्चा जोरदार सुरु होती. पण मीडिया समोर त्यांनी आम्ही फक्त एक चांगले मित्र-मैत्रीण असल्याचे म्हटले आहे.