Irrfan Khan and Babil Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) याचे काल (29 एप्रिल) कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये निधन झाले. 2018 मध्ये कॅन्सरचे निदान झाल्यावर इरफान खान उपचारासाठी लंडनला रवाना झाला होता. त्यातून इरफानची प्रकृती हळूहळू सुधारत होती. दरम्यान त्याने अंग्रेजी मीडियम सिनेमातही काम केले. मात्र मंगळवारी प्रकृती अस्वाथ्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि बुधवारी या सुप्रसिद्ध स्टारने जगाचा निरोप घेतला. त्याच्या मागे त्याची पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. (इरफान खान यांना 'या' एका व्यक्तिसाठी जगायची इच्छा होती; शेवटच्या Interview मध्ये सांगितलेल्या गोष्टी वाचा)

इरफान याने आपल्या करिअरची सुरुवात टेलिव्हीजन शो मधून केली. छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास अतिशय संघर्षमय होता. केवळ अभिनय कौशल्यावर इरफान खान याने यश, प्रसिद्धी मिळवली. मात्र आपल्या दोन्हीही मुलांना, बबील खान (Babil Khan) आणि अयान खान  (Ayan Khan) यांना बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याची कोणतीही घाई त्यांनी केली नाही. दोन्हीही मुलांना त्यांच्या आवडीने काम करण्याचे स्वातंत्र्य त्याने दिले होते.

पहा फोटो:

 

View this post on Instagram

 

Tb

A post shared by Babil Khan (@babil.i.k) on

इरफान खान याचा लहान मुलगा अयान याने 7 वर्षातच हॉलिवूडच्या लाईफ ऑफ पाई (Life of Pi) सिनेमात काम केले होते. या सिनेमात त्याने रवि पटेल याची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर त्याने बॉलिवूडच्या लाईफ इन मेट्रो (Life In A... Metro), एक दीवान था (Ekk Deewana Tha) या सिनेमातही तो झळकला होता. इरफान खान याने मदारी सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान मुलगा अयान याची मीडियासमोर ओळख करुन दिली होती. अयानने 2019 मधअये अनफ्रेंड्स (Unfriends) या वेबसिरीज मध्येही काम केले आहे.

Irrfan Khan Top Movies: इरफान खान ने अभिनय केलेले 'हे' सिनेमे एकदा नक्की पाहाच ! - Watch Video

वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत अयान अभिनय करत असला तरी बाबिल याला कॅमेऱ्यामागे काम करणे अधिक आवडते. सध्या बाबिल खान लंडन मध्ये शिकत आहे. बाबिलने इरफानच्या 'करीब करीब सिंगल' (Qarib Qarib Singlle) सिनेमात कॅमेरा असिस्टंट म्हणून काम केले आहे. इतकंच नाही तर त्याला फोटोग्राफी आणि गिटार वादन याची आवड आहे.