Irrfan Khan's Wife and Sons Outside Kokilaben Hospital (Photo Credits: Yogen Shah)

बॉलिवूडचा दमदार अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) याचे आज (29 एप्रिल) सकाळी मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात (Kokilaben Dhirubhai Ambani Hospital) निधन झाले. काल (28 एप्रिल) प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला कोलन इंफेक्शन झाल्याचे निदान झाले. इरफान खान याला 2018 मध्ये Neuroendocrine Tumour झाल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यावरील उपचारासाठी तो लंडनमध्ये गेला होता. यशस्वी उपचारानंतर सप्टेंबर 2019 मध्ये तो भारतात परतला. त्यानंतर इरफानने 'अंग्रेजी मीडियम' (Angrezi Medium) या सिनेमात काम केले. हा सिनेमा मार्च महिन्यात प्रदर्शित झाला असून तो त्याचा शेवटचा सिनेमा ठरला. (बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचे निधन; शूजीत सरकार याने ट्विट करत दिली माहिती)

इरफानच्या निधनाची  बातमी मिळताच त्याच्या जवळच्या मित्रमंडळींनी आणि कुटुंबातील सदस्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. पत्नी सुतापा सिकदार, मुले बबील आणि अयान खान यांना कोकिलाबेन हॉस्पिटलबाहेर स्पॉट करण्यात आले.

पहा फोटोज:

Vishal Bharadwaj Arrives At Kokilaben (Photo Credits: Yogen Shah)
Irrfan's Family and Friends at Kokilaben (Photo Credits: Yogen Shah)
Irrfan's Sons Babil and Ayaan Outside Kokilaben (Photo Credits: Yogen Shah)
Irrfan's Wife Sutapa Leaves Kokilaben (Photo Credits: Yogen Shah)
Sons Babil and Ayaan Leaving Kokilaben (Photo Credits: Yogen Shah)
Irrfan's Mortal Remains Leaving For Cremation (Photo Credits: Yogen Shah)
Irrfan Khan's Sons Outside Kokilaben (Photo Credits: Yogen Shah)
Irrfan's Wife Sutapa Leaves Kokilaben (Photo Credits: Yogen Shah)

इरफान खान याच्यावर वर्सोवा कबरस्तान येथे अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबिय आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. 2003 मध्ये आलेल्या विशाल भारद्वाज यांच्या 'मकबूल' सिनेमातील इरफान खान याच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले. त्यानंतर 'पिकू', 'लाईफ इन मेट्रो', 'लंच बॉक्स'यांसारख्या सिनेमात आपल्या दमदार अभिनाचे कौशल्य त्याने दाखवले. केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही इरफान खान याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. Mighty Heart, The Warrior, Life of Pi, Jurrasic Park, The Namesake यांसारख्या हॉलिवूडपटात इरफान खान याने काम केले होते.