Mukesh Khanna: 'जर एखादी मुलगी तुमच्याकडे सेक्सची मागणी करत असेल तर..'; मुकेश खन्ना यांच्या वादग्रस्त विधानावर नेटकरी संतापले
Mukesh Khanna (Photo Credit - Twitter)

टीव्ही जगतातील 'शक्तिमान' या मालिकेने प्रसिद्ध झालेला अभिनेता मुकेश खन्ना (Mukesh Khanna) सध्या वादात सापडले आहे. ते त्याच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ शेअर करून आपले मत मांडत असतात. त्याच्या यूट्यूब चॅनेलच्या व्हिडिओचा एक भाग सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे, जो ऐकून नेटकरी चांगलेच संतापले आणि त्यांना जोरदार फटकारले (Trolling) आहे. मुकेश खन्ना या व्हिडिओमध्ये सांगत आहेत की, 'कोणतीही मुलगी एखाद्या मुलाला सांगते की मला तुझ्यासोबत सेक्स करायचा आहे, तर ती मुलगी मुलगी नाही, ती धंदा करते कारण अशा निर्लज्ज गोष्टी कुठलाही सुसंस्कृत समाज मुलगी कधीच म्हणणार नाही. तसे केले तर ती सुसंस्कृत समाजाची नाही. तो त्याचा व्यवसाय आहे. त्यात भागीदार होऊ नका. असे मुकेश खन्ना आपल्या व्हिडिओ मध्ये म्हटले आहे.

नेटकऱ्यांचा संताप

मुकेश खन्ना यांच्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत त्यांना फटकारत आहेत. एका युजरने म्हटलं, ‘ठीक आहे, आता सिव्हिल सोसायटीचा व्हिडीओ बनवा.’ तर दुसर्‍याने लिहिलं, ‘जेव्हा शक्ती आणि मान या दोन्ही गोष्टी तुमच्यातून निघून जातात.’ आणखी एका युजरने शक्तीमानमधलाच संवाद उपरोधिकरित्या लिहिला. ‘अंधेरा कायम रहे’ असं त्या नेटकऱ्याने लिहिलं. (हे देखील वाचा: Comedian Raju Srivastav: कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका, जीम करताना ट्रेडमिलवर बेशुद्ध पडले)

यापूर्वीही सापडले होते वादात

2020 मध्येही मुकेश खन्ना वादात सापडले आहेत. MeToo चळवळीदरम्यान त्यांनी सांगितले होते की, महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर जातात तेव्हा त्यांना लैंगिक शोषण किंवा कोणत्याही प्रकारच्या शोषणाला सामोरे जावे लागते. त्यानंतरही त्यांना यासाठी विरोध सहन करावा लागला होता.