'लॉलीपॉप लागेलू' या गाण्यावर ऋतिक रोशनचे भोजपुरी ठुमके तुम्ही पाहिले का, पाहा व्हिडिओ
Hritik Rosha (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा हँडसम हंक ऋतिक रोशन (Hritik Roshan) ब-याच दिवसानंतर 'सुपर 30' (Super 30) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ऋतिक जितका त्याच्या अभिनयाने मुळे प्रसिद्ध आहे,त्याच्या पेक्षा जास्त त्याच्या नाचण्याच्या अफलातून स्टाईल मुळे. ब्रेक डान्स मध्ये हातखंडा असलेला ऋतिक जेव्हा आपल्याला भोजपुरी गाण्यावर थिरकताना दिसला तर आपली प्रतिक्रिया काय असेल? नुसता विचार जरी केला तरी ही कल्पनाच खूप भन्नाट वाटते. तुमची ही कल्पना प्रत्यक्षात उतरवलीय ते 'लॉलीपॉप लागेलू' (Lollypop Lagelu) या भोजपुरी गाण्याने.

ऋतिक सध्या आपल्या आगामी चित्रपट सुपर 30 च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. आपल्या चित्रपटाला प्रमोट करण्याची एकही संधी ऋतिक सोडत नाहीए. असाच एक प्रमोशन चा व्हिडिओ ऋतिक ने आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर शेअर केला आहे.ज्यात ऋतिक आपल्या चाहत्यांसोबत 'लॉलीपॉप लागेलू' या भोजपुरी गाण्यावर बेभान होऊन भोजपुरी ठुमके देताना दिसत आहे. यात तो विद्यार्थ्यांसोबत या गाण्यावर धमाल मस्ती करताना दिसत आहे. पाहूया हा धमाल व्हिडिओ

ऋतिक आपला चित्रपट 'सुपर 30' ला घेऊन खूपच उत्साही आहे. पटनाचे प्रसिद्ध गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात ऋतिकने आनंद कुमार यांची भूमिका साकारली आहे.

हेही वाचा-  Super 30 'Paisa' Song: तुमच्या बेरंगी दुनियेला रंगीन बनवायला आलयं 'Paisa' साँग, तुम्ही ऐकलं का? 

येत्या 12 जुलै ला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल. ऋतिकचा करिष्मा चित्रपटाला सुपरहिट करण्यास यशस्वी ठरेल का हे लवकरच कळेल.