Hindi Word for Mask: मास्कला हिंदीमध्ये काय म्हणतात? अमिताभ बच्चन यांनी हा खास सेल्फी शेअर करत दिले उत्तर
Amitabh Bachchan (Photo Credits: Insatgram)

कोविड-19 (Covid-19) च्या संकटात प्रत्येक नागरिकाला घराबाहेर पडताना मास्क घालणे अनिवार्य आहे. त्यामुळे अचानकच सर्वसामान्यांच्या जीवनात मास्कचे महत्त्व वाढले आहे. दरम्यान बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी मनोरंजनासाठी सोशल मीडियावर युजर्संना मास्कला काय म्हणतात, हे सांगितले आहे. यासाठी बिग बी (Big B) यांनी एक मास्क घातलेला सेल्फी शेअर केला आहे. मास्कला हिंदीत काय म्हणतात? याचे हटके उत्तर बिग बींनी दिले आहे. (अमिताभ बच्चन एका अपंग चाहत्याने पायाने रेखाटले त्यांचे चित्र; बिग बींनी शेअर केला फोटो)

इंस्टाग्रामवर आपला सेल्फी शेअर करत बिग बी यांनी लिहिले, "मिळाले! मिळाले! मिळाले! खूप कष्टांनंतर मास्कचा हिंदी अनुवाद मिळाला आहे. After a lot of hard work by Ef Vb, he did the translation of 'MASK', in Hindi : *"नासिकामुखसंरक्षक कीटाणुरोधक वायुछानक वस्त्रडोरीयुक्तपट्टिका ! nasikamukhsanrakshak keetaanurodhak vayuchanak vastrdoriyuktpattika!"

Amitabh Bachchan Post:

अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर युजर्सकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तसंच तुम्हाला उगाचच बिग बी नाही म्हणत असं म्हणून त्यांचे कौतुक केले जात आहे. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टीव्ह असतात. पोस्ट, फोटो, ब्लॉगद्वारे ते आपल्या चाहत्यासह कनेक्टेड राहतात. तर कधी मजेशीर पोस्टने ते आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करतात.

लवकरच बिग बी 'कौन बनेगा करोडपति 12' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याचा प्रोमो देखील रिलीज झाला आहे.