अमिताभ बच्चन (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे जगभरात लाखो चाहते आहेत. बिग बींचे असेही काही चाहते आहेत जे त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी रात्रंदिवस त्यांच्या बंगल्याबाहेर उभे असतात. असाच एक अमिताभ यांचा चाहता आहे ज्या अपंग असून त्याने पायाने आपल्या बिग बींचे चित्र बनवले आहे. हा एक तरुण मुलगा असून आयुष (Aayush)असे त्याचे नाव आहे. अमिताभ यांच्या 'गुलाबो सिताबो' (Gulabo Sitabo) या चित्रपटातील मिर्जा पात्राचे चित्र रेखाटले आहे. बिग बींनी सोशल मिडियाच्या माध्यमातून या अवलियाचे कौतुक केले आहे.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे चित्राचा फोटो शेअर केला असून, "हा आहे आयुष.. दिव्यांग. आपल्या हाताचा वापर करु शकत नाही. म्हणून पायाने चित्र रेखाटले आहे. मला घरी त्याला भेटण्याची संधी मिळाली. मी त्याला आशीर्वाद देतो." असे लिहिले आहे. Kaun Banega Crorepati 12: 'कौन बनेगा करोडपती 12 चा नवीन विक्रम; तब्बल 3.1 कोटी लोकांनी दिली ऑडिशन, 42 टक्के सहभाग वाढला

एका प्रशंसकाने अभिनेता आयुष्मान चे देखील कौतुक केले. त्यासोबतच आयुषचे कौतुक करत "या मुलावर देवाचे कृपाशिर्वाद आहेत. जे त्याला जीवनात लढण्यासाठी खूप कामी येतील. सर तुम्ही आमच्यासारख्या अनेक लोकांचे प्रेरणास्थान आहात" असे म्हटले आहे.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) यांचा चित्रपट 'गुलाबो-सिताबो' (Gulabo Sitabo) Amazon Prime वर प्रदर्शित झाला आहे. बिग बी यांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. विकी डोनर, पिकू, ऑक्टोबर अशा लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शक शूजित सरकार (Shoojit Sircar) यांनी हा चित्रपट डायरेक्ट केला असून, जूही चतुर्वेदी यांनी या फिल्मची कथा लिहिली आहे.