जगातील सर्वात सेक्सी पुरुषांच्या यादीतील एक नाव आणि बॉलिवूड मध्ये आपल्या डान्स आणि हॉट बॉडी मुळे चर्चेत असणारा टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आज आपला 30 वा वाढदिवस साजरा करत आहे, सकाळपासूनच अनेक चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे, या सगळ्यात टायगरची बहुचर्चित गर्लफ्रेंड दिशा पटानी (Disha Patani) हिने सोशल मीडियावर त्याला दिलेल्या शुभेच्छा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. दिशाने Bang Bang गाण्यावर टायगर सोबत डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर करून त्यावर Happy b’day! अश्या शुभेच्छा दिल्या आहेत. अर्थात वाढदिवसाला खास व्यक्तीसाठी मोठमोठे मॅसेज लिहिण्याचा ट्रेंड असताना दिशाने थोडक्यात शुभेच्छा का दिल्या असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. पण तिने शेअर केलेल्या डान्स व्हिडीओ मधील दोघांची केमिस्ट्री पाहिल्यावर तिला कदाचित शुभेच्छांसाठी अधिक शब्दांची गरजच नाही हे स्पष्ट होते.
दिशाने शेअर केलेला हा व्हिडीओ जुना आहे, मात्र त्यातील टायगर आणि दिशाचे बॉण्डिंग नक्कीच बघण्यासारखे आहे. यावर त्यांच्या चाहत्यांनी सुद्धा तुम्ही दोघे बेस्ट कपल आहेत म्ह्णून प्रतिक्रिया दिल्या आहेत. टायगर श्रॉफ म्हणतो, दिशा पटानी ला डेट करण्याची माझी लायकी नाही, फॅनच्या प्रश्नाला Instagram स्टोरी मध्ये दिले उत्तर
पहा दिशा पटानी ट्विट
Happy b’day @iTIGERSHROFF pic.twitter.com/bpskldKnbp
— Disha Patani (@DishPatani) March 2, 2020
दरम्यान, आजवर अनेक प्रसंगामध्ये टायगर आणि दिशा एकत्र दिसून आले आहेत, बाघी सिनेमातून त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. नुकतेच बाघी ३ मध्ये सुद्धा टायगर आणि दिशा Do You Love Me म्हणत थिरकताना दिसून आले होते, मात्र काही दिवसांपूर्वी टायगर आणि दिशा या दोघांचे ब्रेक अप झाल्याच्या देखील अनेक चर्चाही तितक्याच रंगत होत्या, त्यामुळे या दोघांचे सध्याचे रिलेशनशिप स्टेटस नेमके काय आहे हा प्रश्न गुलदस्त्यात आहे.