टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि दिशा पटानी (Disha Patani) हे सध्याच्या घडीला बॉलिवूड मधील बहुचर्चित कपल आहे, टायगर-दिशाने स्वतः पुढाकार घेऊन सर्वांसमोर त्यांच्या नात्याची वाच्यता करावी यासाठी त्यांचे चाहते वाट पाहत असतात. मात्र याबाबत टायगरने अलीकडेच केलेल्या एका विधानाने त्यांच्या लव्ह स्टोरी मध्ये ट्विस्ट आलाय की काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे. झालं असं की, टायगर ने काल आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट (Instagram) वरून एक स्टोरी शेअर केली होती, यामध्ये त्याने 'Ask Me Question' या फीचर मधून फॅन्सशी संवाद साधला.
दरम्यान एका फॅन ने त्यांना उत्सुकतेने तुम्ही आणि दिशा डेट करत आहात का असा सवाल केला. यावर टायगरने जे उत्तर दिले ते पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. टायगरने उत्तरात दिशाला डेट करण्याइतकी माझी लायकीच नाहीये असे म्हंटले आहे. टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या नात्यात फूट, या व्यक्तीमुळे दोघांत झाला ब्रेक अप?
पहा टायगर श्रॉफ Instagram story
यानंतर अनेक चाहत्यांनी त्याला त्याच्या प्रेमप्रकारणाबद्दल विचारणा केली, एकाने तर त्याला तुझ्या आजवर किती गर्लफ्रेंड्स झाले आहेत असे विचारले त्यावर टायगरने फार नाही असे म्हणत विषय बदलला. (आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी यांच्यामध्ये पुन्हा एकदा गाठभेट, सोशल मीडियात चर्चांना उधाण)
आजवर अनेक प्रसंगामध्ये टायगर आणि दिशा एकत्र दिसून आले आहेत, बाघी सारख्या सिनेमातून त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी टायगर आणि दिशा या दोघांचे ब्रेक अप झाल्याच्या देखील अनेक चर्चा रंगत होत्या. त्यानंतर आता टायगरचे हे अशाप्रकारचे उत्तर ऐकून ब्रेकअपची अफवा खरीच होती कि काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.