टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या नात्यात फूट, या व्यक्तीमुळे दोघांत झाला ब्रेक अप?
दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ (फोटो सौजन्य- Instagram)

अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि दिशा पटानी (Disha Patani) हे दोघे बॉलिवूडमधील सर्वात जास्त लोकप्रिय कपल्स असल्याचे बोलले जाते. त्यांच्या चाहत्यांना या दोघांची जोडी खुप आवडते. मात्र या दोघांनी उघडपणे त्यांच्या नात्याबद्दल चर्चा केली नाही. पंरतु आता त्यांच्या नात्याबद्दल भुवया उंचावतील अशी खबर समोर आली आहे. पिंकविला यांनी दिलेल्या एका रिपोर्टनुसार, टायगर आणि दिशा या दोघांचे ब्रेक अप झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टायगर आणि दिशा हे दोघेजण गेल्या काही आठवड्यापासून एका वेगळ्याच कारणामुळे तणावात आहेत. या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्यात अधिकृतरित्या ब्रेक अप झाला आहे. काही आठवड्यांपूर्वी या दोघांना असा निर्णय घेतला आणि फक्त त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना याबद्दल माहिती झाले होते.

या दोघांच्या जवळच्या एका सूत्रांनी असे म्हटले आहे की, खुप काळापासून या दोघांमध्ये मतभेद होते. मात्र दोघे एकत्र राहण्यासाठी सर्व गोष्टी करायचे. परंतु दिशा आणि टागयर यांनी आपण एक चांगले मित्रमैत्रीण उत्तम राहू शकतो असे म्हटले आहे. त्याचसोबत दिशा हिला आदित्य ठाकरे याच्यासोबत सुद्धा पाहिले होते. पण आदित्य ठाकरे या दोघांच्य ब्रेक अपचे कारण नसल्याचे सांगितले जात आहे.(आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी यांच्यामध्ये पुन्हा एकदा गाठभेट, सोशल मीडियात चर्चांना उधाण)

 

View this post on Instagram

 

Happy birthday D! 🍰🍰🍰🔥🔥🔥🐥🐥❤❤❤ @dishapatani

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

टायगर आणि दिशा हिने बागी 2 या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्याचसोबत बेफिक्रे नावाच्या म्युझिक व्हिडिओतून सुद्धा दोघे झळकले होते. तर प्रेक्षकांना या दोघांची जोडी ऑनस्क्रिन प्रचंड आवडत आहे.