सध्या सलमान खान (Salman Khan) सोबतच्या 'भारत' (Bharat) या चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) ही नेहमीच चर्चेत असते. तसेच दिशा हिचे फोटो आणि ग्लॅमरस लूक बद्दल सुद्धा नेहमीच बोलले जाते. मात्र आता दिशा ही एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली असून नुकतीच ती शिवसेनेच्या युवासनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या सोबत जुहू (Juhu) येथे डिनर डेटसाठी गेली असल्याचे मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
यापूर्वी सुद्धा दिशा आणि आदित्य हे एकत्र दिसून आले होते. तेव्हासुद्धा सोशल मीडियात या दोघांबद्दलच्या भेटण्याने चर्चा जोरदार रंगली होती. मात्र आता पुन्हा एकदा डिनर डेटसाठी गाठभेट झाल्याने त्यांच्या मैत्रीची चर्चा सर्वत्र होत आहे.
View this post on Instagram
#dishapatani with #adityathackeray snapped for dinner in juhu #viralbhayani @viralbhayani
तसेच दिशा हिचे नाव टायगर श्रॉफ याच्यासोबत सुद्धा जोडले गेले. टागर आणि दिशा बऱ्याच वेळा लंच डेटला जाताना दिसून आले आहेत. मात्र काही नेटकऱ्यांनी या दोघांच्या भेटीगाठीबद्दल विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.