बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) हिने पुन्हा एकदा तिचा बोल्ड अंदाजातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. दिशाने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटवरुन पोस्ट केलेल्या फोटोत पांढऱ्या रंगाची बिकनी घातली असून त्यात ती खूप बोल्ड अंदाजात झळकली आहे. यापूर्वी ही दिशाचे ग्लॅमरस अंदाजातील फोटोंमुळे तिच्या चाहत्यांची झोप उडाली आहे. त्यात दिशाने नाताळच्या निमित्ताने एक बोल्ड फोटो पोस्ट केला आहे.
दिशाने तिच्या इन्स्टाग्रामवरील अकाउंटवरील या बोल्ड फोटोला कॅप्शन देत असे लिहिले की, "Eat sleep swim repeat, so how are you guys celebrating your new years"
तसेच दिशा पटानी हिचा 2018 वर्षात प्रदर्शित झालेला चित्रपट 'बागी2' मधून ती झळकली होती. या चित्रपटासह अभिनेता टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसून आला होता. तर 'बागी2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली. लवकरच दिशा पटानी ही सलमान खान सोबत काम करताना दिसणार आहे. तर कटरीन कैफ, सुनील ग्रोवर आणि तब्बू ही भारत या चित्रपटातून मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अली अब्बास जफर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.