
Taimur Ali Khan Birthday Special: करीना कपूर खान आणि सैफ अली खानचा छोटा नवाब तैमुर अली खान आज एका वर्षाने मोठा झाला आहे. तैमूर आज आपला तिसरा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र त्याच्या बर्थडेच्या सेलिब्रेशनसाठी करीना आणि सैफने बर्थडे पार्टी आयोजित केली होती. ख्रिसमस अशी या पार्टीची थीम होती. त्याच्या या पार्टीला सोहा अली खानची मुलगी इनाया आणि करिश्मा कपूरची मुले- किआन आणि समीराही हजर होते.
तैमूरसाठी आजचा दिवस खूपच खास आहे. आणि आजच्या या खास दिवशी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तैमूरच्या मालकीच्या वस्तूंची यादी जी ऐकून तुम्हीही व्हाल थक्क. तैमूरकडे कोणत्या महागड्या वस्तूंचे आहेत त्या जाणून घेण्याआधी आपण त्याच्या नावावर असलेलं जे जंगल आहे त्याबद्दल जाणून घेऊया.
तैमूरला हे जंगल त्याच्या बाबांकडून पहिल्या वाढदिवशी भेट म्हणून मिळालं आहे. काही रिपोर्ट्सनुसार हे जंगल सुमारे 1000 चौरस फूट रुंद जमिनीवर आहे आणि 100 पेक्षा जास्त झाडे यात आहेत. बेबोच्या डाएटिशियनने तिच्या इंस्टा पोस्टमध्ये नमूद केले होते, “जंगलात 1000 चौरस फूट भूखंडावर सुमारे 100 झाडे आहेत.
Taimur Birthday Special: पाहा तैमूरचे आजवरचे सर्वात Cute फोटो
करीना आणि सैफ ने तैमूरच्या दुसऱ्या वाढदिवशी त्याला एक टॉय कार (Mercedes Mc Laren) गिफ्ट केली होती. या कारमध्ये बसून तैमूर अनेकदा खेळताना दिसला आहे. नवाब हे त्यांच्या हवेली आणि जमिनींसाठी जास्त ओळखले जातात. विशेष म्हणजे सैफ अली खानची तिन्ही मुलं - सारा अली खान, इब्राहिम अली खान आणि सर्वात लहान तैमूर अली खान हे त्यांच्या 800 कोटींच्या मालमत्तेचे वाटेकरी आहेत. तसेच मुंबईतील वांद्रे येथील फॉर्च्युन क्लासिक या सैफ अली खानच्या सध्याच्या निवासस्थानामध्ये देखील त्यांचा वाटा आहे.