Fraud case: अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला बहीण शमिता आणि आई सुनंदा यांच्यासह समन्स, अडचणी वाढल्या
Shilpa Shetty | (Photo Credits: Facebook)

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) तीची बहीण शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि आई सुनंदा शेट्टी (Sunanda Shetty) यांना समन्स पाठविण्यात आले आहे. शेट्टी कुटुंबीयांनी घेतलेले 21 लाख रुपयांचे कर्ज परत केले नसल्याबद्दल एका उद्योगपतीने तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात कोर्टाने शेट्टी मायलेकींना समन्स पाठवले आहे. एएनआयने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, 'अंधेरी कोर्टाने अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा, शमिता शेट्टी आणि सुनंदा शेट्टी यांच्या विरोधात एका व्यवसायिकाने दाखल केलेल्या तक्रारीनतर समन्स जारी करण्यात आले आहे. या तिघींवर 21 लाख रुपयांचे कर्ज परत न दिल्याचा आरोप आहे.' दरम्यान, कोर्टाने या तिघींनही 28 फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

एका ऑटोमोबाईल एजन्सीच्या मालकानेशिल्पा शेट्टी तीची बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांना यांच्या विरोधात मेसर्स वाई एंड ए लीगल' च्या माथ्यमातून कायदेशीर दाद मागितली आहे. आपल्या तक्रारीत त्याने म्हटले आहे की, या तिघींनी आपली 21 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. व्यावसायिकाने दावा केला आहे की, शिल्पाच्या दिवंगत वडीलांनी 21 लाख रुपये उधार घेतले होते. करारानुसार त्यांनी 2017 पर्यंत व्याजासह संपूर्ण रकमेचा परतवा देणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. तक्रारकर्त्याचा असाही दावा आहे की, शिल्पा शेट्टी हिची बहिण शमिता आणि आई सुनंदा या कर्जाची परतफेड करण्यासाठी अपयशी राहिल्या. जे कर्ज त्याचे वडील आणि सुनंदा यांचे पती सुरेंद्र शेट्टी यांनी 2015 मध्ये 18% व्याजदराने घेतले होते. (हेही वाचा, शिल्पा शेट्टी डाएट म्हणजे मेंटेन फिगर, कमनीय बांधा, नाजूक कटी; घ्या जाणून)

सांगितले जात आहे की, संबंधित व्यवसायिकाने चेक सुरेंद्र यांच्या कंपनीच्या नावे जारी केला होता. एजन्सीच्या मलाकाचा असाही दावा आहे की, सुरेंद्र यांनी आपल्या मुली आणि पत्नीलाही आपल्या कर्जाबाबत माहिती दिली होती. दरम्यान, कर्ज चुकते करण्यापूर्वीच 11 ऑक्टोबर 2016 मध्ये सुरेंद्र शेट्टी यांचे निधन झाले. पुढे शिल्पा, शमिता आणि त्यांची आई सुनंदा यांनी कर्जाची परतफेड करण्यास नकार दिला.