शिल्पा शेट्टी डाएट म्हणजे मेंटेन फिगर, कमनीय बांधा, नाजूक कटी; घ्या जाणून
Shilpa Shetty | (Photo courtesy: instagram)

Shilpa Shetty Fitness Tips: अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही केवळ अभिनयच नव्हे तर तिच्या चिरतारुण्य दर्शवणाऱ्या फिगरसाठीही ओळखली जाते. तिच्या बरोबरीच्या अनेक अभिनेत्री आज वयाच्या शिकार झाल्या आहेत. तसे होणे नैसर्गिकही आहे. पण, शिल्पा शेट्टीला ना वयाचे बंधन ना तिच्या क्षेत्रामुळे निर्माण होणाऱ्या जीवनशैलीच्या परिणामांचे. वय आणि तिचे क्षेत्र या कशाचाच परिणात तिच्या शरीरावर झालेला पाहायाल मिळत नाही. अर्थात ती त्यासाठी तितके कष्टही घेते. पण एका मुलखतीदरम्यान शिल्पा शेट्टीने तिच्या आहाराबद्दल सांगितले. तिच्या एकूण फिगरसाठी तिचा आहार (तरुणाईचा आवडता शब्द डाएट) अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतो. म्हणूनच जाणून घ्या शिल्पा शेट्टीचा डाएट (Shilpa Shetty Diet) कसा असतो.

आपल्या फिटनेसबद्दल बोलताना शिल्पा शेट्टी सांगते की, तंदुरुस्त शरीर आणि निरोगी आयुष्यासाठी केवळ तुमचा व्यायाम किंवा केवळ योगा फायदेशीर ठरत नाही. तर, त्यासोबत तुम्हाला योग्य आहारही घ्यावा लागतो. तुम्ही जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करता पण खाण्यापिण्याकडे मात्र दुर्लक्ष करता असे असेल तर काहीच उपयोग नाही. व्यायाम योगा यासोबत योग्य आणि प्रमाणबद्द डाएटही महत्त्वाचा. शिल्पा शेट्टी अनेकदा तिच्या डाएट आणि एक्सरसाईजचे फोटो, व्हिडिओही इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. त्यातूनही ती सांगते की, सतत तेलकट पदार्थ खाण्याने तुमचे केवळ वजनच वाढत नाही तर, त्यासोबत तुम्हाला विविध आजारांनाही तोंड द्यावे लागते. आरोग्याच्याही समस्या निर्माण होतात. (हेही वाचा, ऋजुता दिवेकरच्या या खास '5'डाएट टीप्सने ठेवा रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात !)

शिल्पाच्या डाएट टीप्स

नाश्ता: शिल्पा नाश्त्यात दलिया (लापशी), दूध किंवा पोषक तत्व असलेली फळे आदिंचा समावेश शिल्पाच्या नाश्त्यात असतो. ती जर प्रवासात असेल तरीसुद्धा ती हेल्दी नाश्ता खाण्यालाच पसंती देते असेही शिल्पा सांगते.

डाएट: आपल्या आहारात शिल्पा नेहमी फायबरयुक्त पदार्थ असतील याबाबत दक्ष असते. कारण, फायबरयुक्त आहार घेतल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. ऑयली फूड (तेलकट पदार्थ) खाल्याने पोटात क्रेविंग होत नाही. त्यामुळे तुम्ही बराच काळ काहीच खात नाही.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी शिल्पा नेहमी कमी कॅलरी असलेले अन्नच खाते. लो कॅलरी फूड शरीरात चरबी निर्माण होऊ देत नाहीत. माईंडफुल इटिंग करण्यासही शिल्पा प्राधान्य देते. माईंडफूल इटिंग ही एक पद्धत आहे. जी आपल्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहायला मदत होते. विकेंडच्या आहारात ती शुगरी किंवा कॅलरी असलेल्या पदार्थांचे सेवन करते.

शिल्पा आपल्या डाएटच्या मदतीने तंदुरुस्त तर राहतेच. पण, आपली फिगरही मेंटेन ठेवते. अत्यंत व्यग्र जिवनशैलीतही ती व्यायाम, योगा आणि आहार या त्रिसूत्रीकडे कधीही दुर्लक्ष होऊ देत नाही. दूर्लक्ष करत नाही. तुम्हीही शिल्पा सारखे फिट राहु इच्छिता तर तिने दिलेल्या टीप्स जरुर अमलात आणा.