Narendra Chanchal | (Photo Credits: Youtube)

आपल्या भजनांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे भजन गायक नरेंद्र चंचल ((Narendra Chanchal ) यांचे निधन (Narendra Chanchal Passes Away) झाले आहे.ते 80 वर्षांचे होते. प्रदीर्घ काळापासून ते प्रकृतिअस्वास्थ्याने त्रस्त होते. त्यांनी राजधानी दिल्ली (Delhi) येथील अपोलो हॉस्पीटल (Apollo Hospital) मध्ये अखेरचा श्वास घेतला. 'चलो बुलावा आया है', 'ओ जंगल के राजा मेरी मैया को लेके आजा' यांसारखी त्यांची काही भजने आणि गाणी लोकप्रिय ठरली आहेत. त्यांनी काही चित्रपट गितेही गायली.

नरेंद्र चंचल यांच्या निधनामुळे मनोरंज आणि इतरही क्षेत्रातून दु:ख व्यक्त केले जात आहे. आई कैलाशवती यांच्याकडून त्यांनी भजन गायनाचे धडे घेतले. त्यांच्या आई कैलाशवती या प्रसिद्ध गायिका होत्या. त्यामुळे आईच्या गायनांच्या मैफीली ऐकतच नरेंद्र चंचल लहानाचे मोठे झाले. त्यामुळे लहानपणापासूनच गायनाकडे वळलेले नरेंद्र चंचल हे पुढे प्रसिद्ध भजन गायक झाले. चंचल यांनी प्रेम त्रिखा यांच्याकडून संगिताचेही धडे घेतले होते. (हेही वाचा, नरेंद्र चंचल यांच्या निधनामुळे मनोरंज आणि इतरही क्षेत्रातून दु:ख व्यक्त केले जात आहे. आई कैलाशवती यांच्याकडून त्यांनी भजन गायनाचे धडे घेतले. त्यांच्या आई कैलाशवती या प्रसिद्ध गायिका होत्या. त्यामुळे आईच्या गायनांच्या मैफीली ऐकतच नरेंद्र चंचल लहानाचे मोठे झाले)

नरेंद्र चंचल यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1940 मध्ये पंजाब (Punjab) येथील अमृतसर (Amritsar) येथे झाला. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नरेंद्र चंचल यांच्या निधमामुळे त्यांच्या चाहत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांचया निधनाबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केले आहे.